एक्स्प्लोर

Kolhapur Rain Update : पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील 36 बंधारे पुन्हा पाण्याखाली 

Panchganga River : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये सर्वदूर सुरु असलेल्या धुवाँधार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील प्रमुख 15 धरणे यापूर्वीच भरली आहेत.

Panchganga River : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये सर्वदूर सुरु असलेल्या धुवाँधार पावसाने (Kolhapur Rain Update) नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील प्रमुख 15 धरणे यापूर्वीच भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आजही पावसाचा जोर कायम राहिल्यास मोसमात तिसऱ्यांदा पंचगंगा नदी (panchaganga river) पात्राबाहेर येण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांपासून नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. 

दुपारी 12 वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 26 फूट 8 इंच इतकी आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी 39 फूट व धोका पातळी 43 फूट आहे. 

राधानगरी धरणाचा  6 व्या क्रमांकाचा दरवाजा बंद

पावसाने थैमान सुरु असल्याने काल राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे काही तासांमध्ये उघडले होते. दरम्यान, आज सकाळी 6 व्या क्रमांकाचा दरवाजा बंद झाला आहे. सध्या राधानगरी धरणाचा 4 व 5 वा दरवाजा खुला आहे. धरणातून भोगावती नदी पात्रात 4 हजार 456 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील 36 बंधारे पाण्याखाली

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने जिल्ह्यातील 36 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 

जिल्ह्यातील कोणत्या बंधाऱ्यांवर पाणी?

  • पंचगंगा नदी -  शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई,  इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ 
  • भोगावती  नदी - सरकारी कोगे, राशिवडे, हळदी 
  • तुळशी नदी -  बीड
  • कासारी नदी -  यवलूज, ठाणे, आळवे 
  • दुधगंगा नदी - सिद्धनेर्ली,  दत्तवाड, सुळकूड
  • ताम्रपर्णी नदी - चंदगड, कुर्तनवाडी
  • घटप्रभा नदी -   पिळणी,  बिजूर  भोगाली,  कानडे सावर्डे, हिंडगाव
  • वेदगंगा नदी - निळपण,  वाघापूर,  कुरणी,  बस्तवडे, चिखली 
  • हिरण्यकेशी नदी - निलजी, ऐनापूर, गिजवणे, साळगांव

अलमट्टी धरणातून विसर्ग कायम 

पावसाचा जोर वाढल्याने पूर्ण क्षमतेने भरलेल्या अलमट्टी धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. अलमट्टी धरणातून 52 हजार 500 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. हिप्परगी धरणातून विसर्ग सध्या बंद आहे. दुसरीकडे कोयना धरणातूनही विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणात 3 हजार 76 क्युसेकने आवक सुरु आहे. त्यामुळे कोयना धरणातून 1 हजार 50 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget