Raju Shetti : खासगी शिक्षण संस्थांकडून लुबाडणूक थांबवण्यासाठी रस्त्यावरच्या लढाईला तयार व्हा; राजू शेट्टींचे आवाहन
आताच्या खासगी शिक्षण संस्थांकडून ग्रामीण भागातील विद्यार्थांना फीच्या माध्यमातून लुबाडलं जात आहे, यासाठी आपल्याला रस्त्यावरील लढाई करण्याची गरज असल्याचे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
Raju Shetti : राज्यातील खासगी शिक्षण संस्था ( private educational institutes) राज्यातील बड्या राज्यकर्त्यांच्या संस्था आहेत, त्यांची लुबाडणूक सुरू आहे. फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी जीवाचं रान केलं, पण आताच्या खासगी शिक्षण संस्थांकडून ग्रामीण भागातील विद्यार्थांना फीच्या माध्यमातून लुबाडलं जात आहे, यासाठी आपल्याला रस्त्यावरील लढाई करण्याची गरज असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (raju shetti on private educational institutes) यांनी व्यक्त केले. ही लुबाडणूक थांबवण्यासाठी विद्यार्थी संघटनेच्या पाठीशी असल्याची ग्वाही शेट्टी यांनी दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (swabhimani shetkari sanghtana) वतीने स्वाभिमानी विद्यार्थी परिषद पार पडली. या विद्यार्थी परिषदेत विविध पदाधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आल्या. यामध्ये राज्य विद्यार्थी कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले.
राज्यसेवा आणि लोकसेवेच्या परीक्षांच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान
यावेळी शेट्टी (raju shetti on private educational institutes) म्हणाले की, मागील कित्येक वर्षांपासून चळवळीत काम करताना शेतकरी हित पाहिलं, पण शेतकऱ्यांच्या मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली. सध्या खासगी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची लूट सुरू आहे. ही लूट हाणून पाडण्यासाठी विद्यार्थी संघटनेने एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचे शेट्टी म्हणाले. सध्या राज्यसेवा आणि लोकसेवेच्या परीक्षांच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
ते पुढे म्हणाले की, आपल्या ऊस आंदोलनामुळे पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे येऊ लागले. याचा फायदा शेतकऱ्यांच्या मुलांना झाला. हीच शेतकऱ्यांची मूलं आज परदेशात नोकरी करतात. या कार्यक्रमास शिरोळ पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे, प्रशांत कुंभोजे, सौरभ शेट्टी, डॉ.महावीर अक्कोळे, तेजस कुलकर्णी, संदीप राजोबा, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या