Raju Shetti and MahaVikas Aaghadi : राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा फिस्कटलं, हातकणंगले मतदारसंघातून ठाकरे गटाचा उमेदवार ठरला?
Hatkanangle Lok Sabha : हातकणंगले लोकसभा (Hatkanangle Lok Sabha) मतदारसंघातून ठाकरे गट उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा बिनसलंय.
Hatkanangle Lok Sabha : हातकणंगले लोकसभा (Hatkanangle Lok Sabha) मतदारसंघातून ठाकरे गट उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा बिनसलंय. ठाकरे गट उमेदवार देणार असल्याने राजू शेट्टी (Raju Shetti) यांना महाविकास आघाडी पाठिंबा देणार असल्याच्या चर्चेला पुर्णविराम मिळालाय. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज (दि.10) मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
ठाकरे गट कोणाला उमेदवारी देणार ?
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हातकणंगले मतदारसंघाबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीत शिवसेना मशाल या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु झाली आहे. ठाकरे गट सत्यजित पाटील यांना उमेदवारी देऊन मतविभाजनासाठी प्रयत्न करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, सतेज पाटील आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच सत्यजित पाटील यांची उमेदवारी निश्चित केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडी राजू शेट्टींना पाठिंबा देणार असल्याची चर्चा होती
महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या स्वाभिमानी पक्षासाठी एक जागा सोडण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही आठवड्यांत सुरु होती. त्यामुळे यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्येही शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यात लढत होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता ठाकरे गटाकडून हातकणंगले मतदारसंघात उमेदवार देण्यात येणार आहे. दरम्यान, राजू शेट्टी स्वबळावर लढले आणि ठाकरे गटाने उमेदवार दिला तर मतविभाजनाचा फायदा कोणाला होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
2019 मध्ये धैर्यशील मानेंकडून राजू शेट्टींचा पराभव
शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. या निवडणुकीत धैर्यशील मानेंना 5,85, 776 मते मिळाली तर राजू शेट्टींना 4,89,737 मतं पडली होती. त्यामुळे शेट्टींना 96 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, तेव्हा शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या नेतृ्त्वात निवडणूक लढली होती. आता शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर महायुतीकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
Ajit Pawar and Eknath Shinde : अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, महाशक्तीकडून किती जागा मिळणार?