Rajaram Sakhar Karkhana : कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अमल महाडिक यांची एकमताने निवड
Rajaram Sakhar Karkhana :
Rajaram Sakhar Karkhana : कोल्हापुरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या (Chhatrapati Rajaram Sahakari Sakhar Kharkhana) नुतन अध्यक्षपदी माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांची तर उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण (Narayan Chavan) यांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक राज्यात चांगलीच गाजली होती. माजी आमदार महादेवराव महाडिक विरुद्ध माजी गृहराज्यमंत्री काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यात लढत रंगली होती. या निवडणुकीत महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik)पॅनलने सतेज पाटील (Satej Patil) यांच्या पॅनलचा पराभव करत विजय मिळवला होता. आज या साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालकांची पहिली बैठक झाली. या बैठकीत नुतन अध्यक्षपदी माजी आमदार अमल महाडिक तर उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण यांची निवड करण्यात आली.
राजाराम कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार अमल महाडिक प्रबळ दावेदार होते. मात्र नव्या चेहऱ्याला संधी देणार का? याचीही चर्चा होती. निवडणूक निर्णय अधिकारी निलकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली या बैठती अमल महाडिक यांची अध्यक्षपदी तर नारायण चव्हाण यांची उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली.
राजाराम सहकारी साखर कारखान्यावर महाडिकांची एकहाती सत्ता
दरम्यान, कारखान्याची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि अत्यंत टोकदार अशा झालेल्या प्रचाराने अवघ्या कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या राजाराम कारखान्याच्या लढतीत सत्ताधारी महाडिक गटाने बाजी मारली होती. सत्ता अबाधित राखताना महाडिक गटाने कारखान्याच्या सर्वच्या सर्व 21 जागांवर विजयी मिळवला. गेल्या 28 वर्षांपासून महाडिकांची कारखान्यावर सत्ता आहे. निवडणुकीमध्ये कंडका पाडायचाच या टॅगलाईनने स्लोगनने प्रचारामध्ये उतरलेल्या आमदार सतेज पाटील यांच्याविरोधी परिवर्तन आघाडीचा पुरता धुव्वा महाडिक आघाडीने उडवला. महाडिकांची कधी नव्हे ती या निवडणुकीत इलेक्शन मॅनेजमेंट परफेक्ट दिसून आली. 29 उमेदवारांना पोटनियमांतील तरतुरदीमधून अवैध ठरवल्याने हा झटका सतेज पाटलांना ऐन निवडणुकीत जिव्हारी लागणारा होता. त्यामुळे सतेज पाटील गटाचे तगडे उमेदवार रिंगणातून बाहेर गेले आणि त्याचा फटकाही बसला.
दुसरीकडे, अमल महाडिकांनी संयमाने प्रचार करतानाच धनंजय महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी आक्रमक प्रचार केला. 'महाडिक भ्यालेत' या टीकेवरुन त्यांनी त्यांनीही चोख प्रत्युत्तर सभांमधून दिले. सतेज पाटलांकडून सातत्याने ऊसाच्या कमी दराचा उल्लेख झाला, पण तो सभासदांना भावला नसल्याचे दिसून आले.