राहुल गांधींवर कसाबप्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि पाकिस्तानला पाठवा : नितेश राणे
Nitesh Rane Onr Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून त्यांना भारताबाहेर काढून पाकिस्तानला पाठवून द्या, अशी मागणी केली आहे.
Nitesh Rane Onr Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांना भारताबाहेर काढून पाकिस्तानला पाठवून द्या, अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे. कसाबप्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना भारताबाहेर काढलं पाहिजे, असेही राणे म्हणालेत. नितेश राणे कोल्हापुरात बोलत होते.
नितेश राणे म्हणाले की, ओबीसींच्या नावाने चुकीचं बोलता, मग संसदीय पद्धतीने कारवाई झाल्यावर बीजेपीच्या नावाने का बोंबलता? परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींवर कसाबप्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. राहुल गांधींना पाकिस्तानात पाठवा. नितेश राणे यांनी सांगलीसह महाराष्ट्रात लँड जिहाद सुरू असल्याचा दावा केला. अनधिकृत धार्मिक स्थळ उभी करायची डुक्कर कापायची. जेणेकरुन हिंदू तिथून निघून जातील, असा प्रकार राज्यात सुरू आहे. मुद्दा यावर कारवाईचा आहे. त्याला स्क्रिप्टेड म्हणा किंवा अन्य काही म्हणा असेही नितेश राणे म्हणाले.
नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, लव्ह जिहाद विरोधात कायद्याची मागणी आम्ही करत आहोत. सामान्य लोकांना देखील याची माहिती व्हावी, यासाठी व्याख्यान आणि प्रबोधनातून प्रयत्न केला जात आहे. मुंब्राचा जित्तूदिन आणि अबू आझमी लव्ह जिहादची आकडेवारी खोटे असल्याचा दावा करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
औरंगाबादचे नाव बदलल्यानंतर स्टेटस च्या माध्यमातून वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. तुम्ही रक्ताची भाषा करणार असाल तर आमच्याकडूनही रक्ताची भाषा होईल, राजकारण्यांना चौकटीत राहून बोलणं अडचणीचं ठरत असतं. हिंदू समाज धर्मासाठी कुणावर जबरदस्ती करत नाही. धर्मांतर विरोधात सुरू असलेली ही लढाई सोपी नाही. लव्ह जिहादच्या असंख्य केसेस पोलीस आणि समाजासमोर येऊ शकल्या नाहीत. मुस्लिम तरुण हिंदू आहे म्हणून खोटं सांगून हिंदू मुलींशी लग्न करतात. कुटुंब नियोजन केले की खर सांगतात की आम्ही मुस्लिम आहे. लव्ह जिहाद करण्यासाठी मुस्लिम तरुणांना लाखो-करोडो रुपये दिले जातात, असेही ते म्हणाले. लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र करणार म्हणजे करणार, महाराष्ट्र सर्वात कडक धर्मांतर विरोधी कायदा आपल्याला पाहायला मिळेल, असा दावाही त्यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या