एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानी नागरिकांची झाडाझडती; कोल्हापुरात किती जणांचा आश्रय? नेमका आकडा समोर

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व वैध व्हिसा 27 एप्रिलपासून रद्द करण्यात आले आहेत, तर पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा 29 एप्रिलपर्यंत वैध राहतील.

Pahalgam Terror Attack :  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने अत्यंत आक्रमक पवित्रा घेताना  पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा रद्द केले आहेत. तसेच आपल्या नागरिकांना पाकिस्तानात प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. पहलगाममध्ये निष्पाप 26 पर्यटकांची हत्या करण्यात आल्यानंतर देशात संतापाची लाट पसरली आहे.  भारताने 1960 मधील सिंधू जल करार रद्द केला आहे. अटारी येथील एकमेव कार्यरत जमीन सीमा क्रॉसिंग सुद्धा बंद केलं आहे. 

सर्व वैध व्हिसा 27 एप्रिलपासून रद्द

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने (सीसीएस) गुरुवारी घेतलेल्या निर्णयांचाच एक भाग असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारत सरकारने तत्काळ प्रभावाने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा सेवा निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व वैध व्हिसा 27 एप्रिलपासून रद्द करण्यात आले आहेत, तर पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा 29 एप्रिलपर्यंत वैध राहतील, असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. भारतात सध्या असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी भारत सोडावे लागेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, वैध भारतीय व्हिसा असलेल्या पाकिस्तानींची नेमकी संख्या किंवा सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या भारतीयांची संख्या त्वरित निश्चित करता येत नाही. तथापि, जिल्हानिहाय देशात किती पाकिस्तानी आहेत याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. 

कोल्हापुरात 61 पाकिस्तानी नागरिक 

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात 61 पाकिस्तानी नागरिक असल्याचे समोर आले आहे. हे सर्व नागरिक लाँग टर्म व्हिसावर कोल्हापूरमध्ये राहत आहेत. यामध्ये तीन मुस्लीम महिलांचा समावेश आहे, तर उर्वरित सर्व हिंदू आहेत. दुसरीकडे, भारतीय बाजूने यापूर्वी अटारी भू-सीमेवरून देशात प्रवेश करणाऱ्या सर्व पाकिस्तानींना 1 मे पर्यंत देश सोडण्यास सांगितले होते आणि पाकिस्तानी नागरिक आता सार्क व्हिसा सूट योजनेसाठी (SVES) पात्र राहणार नाहीत असे म्हटले होते. पहलगाम येथील दहशतवादी हल्ला हा जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांवरील दोन दशकांतील सर्वात मोठा हल्ला आहे. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील नागरिकांवर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. 2019 मध्ये पुलवामामध्ये जवानांवर दहशतवाही हल्ला झाला होता. 

पहलगाम हल्ल्याशी सीमापार संबंधांबद्दल माहिती देण्यात आलेल्या सीसीएसच्या बैठकीनंतर, भारत सरकारने बुधवारी पाच दंडात्मक उपाययोजनांची घोषणा केली. पाकिस्तानच्या तीन लष्करी अधिकाऱ्यांना हद्दपार केले आणि पाकिस्तानला नवी दिल्लीतील उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या 55 ​​वरून 30 पर्यंत कमी करण्यास सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
Embed widget