(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur District Gram Panchayat Election : पाचगाव, पुलाची शिरोलीत अत्यंत चुरशीने मतदान; महाडिक, सतेज पाटील गटाची प्रतिष्ठा पणाला
Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावांमध्ये तसेच आजी माजी आमदारांच्या गावामध्ये निवडणूक लागली असल्याने प्रचंड ईर्ष्या पहायला मिळत आहे.
Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींसाठी सकाळपासून मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळपासून उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासून रांगा लागल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावांमध्ये तसेच आजी माजी आमदारांच्या गावामध्ये निवडणूक लागली असल्याने प्रचंड ईर्ष्या पहायला मिळत आहे.
कोल्हापूर दक्षिण आणि करवीर मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सतेज पाटील, नरके आणि महाडिक गटामध्ये आहे. कोल्हापूर दक्षिणमधील सर्वाधिक संवेदनशील असलेल्या पाचगाव आणि महाडिकांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या शिरोलीत सकाळपासून चुरशीने मतदान होत आहे. आतापर्यंत मोठ्या चुरशीने मतदान होण्याचा इतिहास पाहता आजही मोठ्या चुरशीने एकूण मतदान होण्याची आशा आहे. (Kolhapur District Gram Panchayat Election)
कोल्हापूर दक्षिण काँग्रेसचा बालेकिल्ला
कोल्हापूर दक्षिण काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पाचगाव, कंदलगाव व मोरेवाडीत दोन गटात सामना होत आहे. अपक्षही रिंगणात आहेत. पाचगावमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षित आहे. सरपंचपदासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. या ठिकाणी महाडिक, पाटील गटात चुरस आहे. कंदलगावमध्ये याच दोन गटात सामना आहे. मोरेवाडीतही पाटील व महाडिक गटात चुरस आहे. पाचगावमध्ये एकूण वॉर्ड 6 असून 17 सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. पाचगावमध्ये 16 हजार 283 मतदार आहेत. सरपंचपदासाठी प्रियांका संग्राम पाटील, सुवर्णा भिकाजी गाडगीळ, भारती संतोष ओतारी, मिनाक्षी महेश डोंगरसाने रिंगणात आहेत.
शिरोलीतही तगडी फाईट
दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या गामपंचायत असलेल्या शिरोली ग्रामपंचायतीसाठी सत्ताधारी शाहू स्वाभिमानी आघाडी विरुद्ध महाडिक आघाडी अशी थेट दुरंगी लढत होत आहे. सरपंचपदासाठी शाहू आघाडीकडून माजी ग्रामपंचायत सदस्य रूपाली खवरे आणि महाडिक आघाडीकडून पद्मजा करपे रिंगणात आहेत. सत्तेत परतण्यासाठी महाडिक आघाडीने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. शिरोली ग्रामपंचायतीमध्येही 17 सदस्य आहेत. तसेच 6 प्रभागांसह 19 हजार363 मतदार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या