एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी मंत्रालय कार्य करेल; नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची ग्वाही

कोल्हापूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असून येत्या मार्चपर्यंत नवीन टर्मिनल इमारतीची निर्मिती करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी दिली. 

Kolhapur Airport : स्वर्गीय राजाराम महाराजांच्या दूरदृष्टीने तत्कालीन काळात कोल्हापूर विमानतळाची  निर्मिती झाली. या विमानतळाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबध्द असून येत्या मार्चपर्यंत नवीन अद्ययावत टर्मिनल इमारतीची निर्मिती करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी दिले. 

केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेतंर्गत स्टार एअरकडून कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर या आठवड्यातील तीन दिवस (मंगळ/गुरु/शनि) सुरु करण्यात आलेल्या विमानसेवेचा प्रारंभ ज्योतिरादित्य शिंदे यांच्या स्ते दूरदृष्यप्रणालीव्दारे फ्लॅग ऑफ दाखवून करण्यात आला. शिंदे पुढे म्हणाले, या विमातळामुळे उद्योग, व्यापार, पर्यटन, कृषी तसेच इतर बाबींना चालना मिळून कोल्हापूरचा विकास होण्यास मदत होईल. या विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय उड्डाणे व्हावीत यासाठी आपले मंत्रालय कार्य करेल.

कोल्हापूर येथील हे विमानतळ देशातील एक महत्वाचे विमानतळ म्हणून नावारुपाला येईल, असा आशावाद राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी व्यक्त केला.

विमानसेवा टिकविण्याची जबाबदारी कोल्हापूरवासियांची

छत्रपती शाहू महाराज म्हणाले, या विमानसेवेत सातत्य रहावे. त्याचबरोबर मोठ्या अपेक्षेने सुरु झालेली ही विमानसेवा टिकविण्याची जबाबदारी कोल्हापूरवासियांची आहे. या विमानतळावरुन केवळ कोल्हापूर-मुंबई परत कोल्हापूर अशी सेवा सुरु न राहता आंतरराष्ट्रीय विमान सेवाही सुरु व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या विमानतळाच्या विकासासाठी व विस्तारीकरणासाठी शासनाकडून जे जे शक्य आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरु करण्याला स्टार एअर प्राधान्य देणार

यावेळी खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने आमदार हसन मुश्रीफ यांनीही मनोगत व्यक्त केले. स्टार एअरचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी प्रास्ताविकात स्टार एअरची कनेक्टीव्हीटी देशातील प्रमुख 19 शहरांशी असल्याचे सांगितले. भविष्यात कोल्हापूर विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरु करण्याला स्टार एअर प्राधान्य देणार असल्याचे सांगून कोल्हापूरच्या विकासाकरिता स्टार उद्योग समूह सर्वोतोपरी योगदान देणार असल्याची ग्वाही या प्रसंगी दिली.

यावेळी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अपर सचिव उषा पहाडी, स्टार एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन सिमरनसिंग तिवाना आदी दूरदृष्यप्रणालीव्दारे उपस्थित होते. 

कोल्हापूर विमानतळावर छत्रपती शाहू महाराज, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार हसन मुश्रीफ, राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे डॉ. संजय पाटील, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे, स्टार एअरचे चेअरमन संजय घोडावत, संचालक श्रेणिक घोडावत आदी उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale Exclusive : मंत्रि‍पदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतातBharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाहीMahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?Sunil Shelke Meet Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला मोदी-शेळकेंच्या भेटीचा किस्सा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
Maharashtra Assembly Election Result 2024 : फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
Dhule Rural Vidhan Sabha Election Result 2024 : अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
Embed widget