एक्स्प्लोर

Kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळावरून श्रेयवाद उफाळला! धैर्यशील मानेंनी 'धागा' जोडताच धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

Kolhapur Airport : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोल्हापूर विमानतळावरून आज मुंबई-कोल्हापूर विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर राजकीय टोलेबाजी चांगलीच रंगली.

Kolhapur Airport : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोल्हापूर विमानतळावरून आज मुंबई-कोल्हापूर विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर राजकीय टोलेबाजी चांगलीच रंगली. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर विमानतळावरून राजकीय कुरघोडी रंगल्याचे दिसून आले. कोल्हापूर जिल्ह्यातील सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. तो सुद्धा यावेळी  पुन्हा एकदा दिसून आला. 

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा शुभारंभ कार्यक्रमाच्या जाहिरातीमध्ये खासदार धनंजय महाडिक यांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व नेत्यांचा समावेश आहे. समस्त कोल्हापूर या नावाने ही जाहिरात आहे. त्यामुळे हाच धागा पकडून  खासदार धैर्यशील माने यांनी भाषण केले. 

 धैर्यशील माने म्हणाले, की संजय घोडवत यांच्या संजय नावामध्ये सतेज पाटील यांच्या नावातील 'स' आणि धनंजय महाडिक यांच्या नावातील 'जय' असा उल्लेख आहे. त्यामुळे माने यांनी दोघांच्या नावाचा धागा जोडताच खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता टोला लगावण्याची संधी सोडली नाही. 

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, विमानतळाच्या या कार्यक्रमाची एक जाहिरात देण्यात आली. त्यामध्ये धनंजय महाडिक वगळता जिल्ह्यातील सगळे नेते आहेत. समस्त कोल्हापूरकर या नावाने ही जाहिरात दिली आहे. मात्र, काम केलं असलं, की जाहिरात करण्याची गरज नाही. त्यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला. 

दरम्यान, यावेळी बोलताना आमदार हसन मुश्रीफ यांनी 64 एकरचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे. संजय घोडावत ग्रुपची ही सेवा थेट न्यूयॉर्कपर्यंत पोहचावी अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. 

कोल्हापूर - मुंबई विमानसेवा आजपासून पुन्हा सुरू

  • संजय घोडवत यांच्या स्टार एअर कंपनीची सेवा आजपासून सुरू
  • आठवड्यातील मंगळवार, गुरुवारी आणि शनिवारी असेल विमानसेवा
  • कोल्हापूर ते मुंबईसाठी 2 हजार 573 रुपये इतका तिकीट दर असेल
  • मुंबईतून सकाळी 10.30 वाजता टेकऑफ तर कोल्हापुरात 11.20 वाजता लँडिंग
  • कोल्हापुरातून सकाळी 11.50 वाजता टेकऑफ तर मुंबईत 12.45 वाजता लँडिंग होणार

दुसरीकडे कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना ही सेवा सोयीची ठरणार आहे. सध्या कोल्हापूरातून तिरुपती, बंगळुरू, अहमदाबाग, हैदराबाद या शहरात सध्या विमानसेवा सुरू आहे.  या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Shivaji Patil on Satej Patil: मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा
मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा
तुकाराम मुंढेंचा धडाका सुरूच; पुणे, कोल्हापुरात मेडिकल फर्मवर छापा, 25 लाखांची औषधं जप्त
तुकाराम मुंढेंचा धडाका सुरूच; पुणे, कोल्हापुरात मेडिकल फर्मवर छापा, 25 लाखांची औषधं जप्त
Jayant Patil: खातं एकनाथ शिंदेंकडे, निर्णय मात्र मुख्यमंत्री फडणवीस घेताय; पर्यायी रस्ता असताना शक्तिपीठचा अट्टाहास का? कोल्हापुरातील जनआंदोलनातून जयंत पाटलांचा सरकारला सवाल
खातं एकनाथ शिंदेंकडे, निर्णय मात्र मुख्यमंत्री फडणवीस घेताय; पर्यायी रस्ता असताना शक्तिपीठचा अट्टाहास का? कोल्हापुरातील जनआंदोलनातून जयंत पाटलांचा सरकारला सवाल

व्हिडीओ

Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report
Is Mamata Banerjee merging TMC with Congress : ‘तृणमूल’ होणार‘काँग्रेस’? | Special Report
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
West Bengal : TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं

Embed widget