एक्स्प्लोर

Rohit Pawar on BJP: भाजपने घर फोडलं, पक्ष फोडला, फक्त राष्ट्रवादी नाही तर दोन पक्ष फोडले; रोहित पवारांचा हल्लाबोल

MLA Rohit Pawar : सत्तेत राहणं सोपं होतं, पद मिळवणे सोपं होतं,  पण हे सगळं धुडकावून विचाराबरोबर राहून संघर्षाची तयारी आम्ही केली आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले. 

कोल्हापूर : भाजपचा राजकीय विचार ज्या ठिकाणाहून संपतो, तेथून शरद पवार साहेबांचा विचार सुरू होतो. भाजपने घर फोडलं, पक्ष फोडला, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर दोन पक्ष फोडले, त्यामुळे वार मुळावर होणं गरजेचं आहे, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला. शरद पवार यांची कोल्हापुरात  (Kolhapur News) शुक्रवारी 25 ऑगस्ट रोजी सभा होत असून  या सभेपूर्वी रोहित पवार  जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. 

त्यांना महत्त्व द्यायचं नाही हे पवार साहेबांच्या डोक्यात असेल

शिवसेना फुटली आणि आपापसात भांडत बसले, भाजप बघत बसले. उद्धव ठाकरे यांनी पक्ष फुटल्यानंतर एक वर्षांनी भाजपवर टीका सुरू केली आहे, शरद पवार साहेब यांनी पहिल्यापासूनच भाजपवर टीका सुरू केली आहे. मुळावर घाव घालून जे गेलेत त्यांना महत्व द्यायचं नाही हे पवार साहेबांच्या डोक्यात असेल. कार्यकर्त्यांची ताकद हीच आमची ताकद आहे, आम्ही सर्वजण फिरत आहे. आदित्य ठाकरे यांनी आणि आम्ही देखील संघर्षाची भूमिका ठेवली आहे. सत्तेत राहणं सोपं होतं, पद मिळवणे सोपं होतं, पण हे सगळं धुडकावून विचाराबरोबर राहून संघर्षाची तयारी आम्ही केली आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले. 

साहेब थेट मुळावर घाव घालतात, भाजपला टार्गेट केलंय

रोहित पवार म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याने महाराष्ट्राला पुरोगामी विचार दिला आहे. दसरा चौकातून पुन्हा एकदा महाराष्ट्राला पुरोगामी संदेश द्यायचा असेल त्यामुळे दसरा चौकाची पवार साहेबांनी केली असेल. येथील ताकद आहे ती कार्यकर्त्यांची आहे, आम्ही केवळ साहेबांचा संदेश घेऊन आलो आहोत. आमदार किती आहेत त्याच्यापेक्षा कार्यकर्ते किती आहेत हे महत्वाचे आहे. त्यांनी पुढे सांगितले की, साहेबांना एका पत्रकारांनी विचारलं होतं की आपल्यासोबत किती आमदार आहेत. त्यावेळी साहेबांनी शून्य असं उत्तर दिलं होतं. आमदारांपेक्षा लोकांमध्ये जाऊन लोकांची ताकद घेऊन विचार जपण्याची गरज असल्याचं साहेबांनी म्हटलं होतं. भाजपने घर फोडलं, पक्ष फोडला, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर दोन पक्ष फोडले. त्यामुळे वार मुळावर होणं गरजेचं आहे. साहेब थेट मुळावर घाव घालतात, भाजपला टार्गेट केलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Abhijit Dipke Grandmother Death: आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
NZ vs IND ODI Squad : भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
Embed widget