एक्स्प्लोर

Hasan Mushrif on Chandrakant Patil : शाईफेकीचा दुर्दैवी प्रकार घडायला नको होता, पण दादांची ही सातवी ते आठवी माफी असेल; हसन मुश्रीफांचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला

आ. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी शाईफेकीचा दुर्दैवी प्रकार घडायला नको होतो, अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, दादांची ही सातवी ते आठवी माफी असेल, असा खोचक टोलाही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

Hasan Mushrif on Chandrakant Patil : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी शाईफेकीचा दुर्दैवी प्रकार घडायला नको होतो, अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, दादांची ही सातवी ते आठवी माफी असेल, असा खोचक टोलाही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. हसन मुश्रीफ आज कोल्हापूरमध्ये (Kolhapur) पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली.

ते म्हणाले की, शाईफेकीसारखा दुर्दैवी प्रकार घडायला नको होता, पण दादा सातत्याने अशी वक्तव्य करतात. यावेळी त्यांनी अनिल देशमुखांना मिळालेल्या जामीनावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, जामीनाची बातमी ऐकून आम्ही आनंदीत झालो होतो, पण पुन्हा दहा दिवसाची स्थगिती दिली असेल, तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. ईडीने जामीन दिला, पण सीबीआयने विरोध केला. त्यांचं वय 75 आहे. त्यांना दवाखान्यात दाखल करावं लागत आहे. न्यायालय याचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल. 

राज्यपालांचे पत्र म्हणजे शिवरायांचा अपमान

राज्यपालांनी (Bhagat Singh Koshyari) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून खुलासा केला आहे. याबाबत विचारले असता त्यांनी त्यांचे पत्र म्हणजे शिवरायांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. त्यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. राज्यपालांच्या पत्राने पुन्हा गोंधळ होणार असल्याचे ते म्हणाले. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना सहानुभूती दाखवणार असेल, तर महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

तर ठाकरे गटाचे खासदार निधी देतील

मुश्रीफ यांनी भाजप आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या धमकीचाही समाचार घेतला. अशा प्रकारचे वक्तव्य कधी केली जात नाहीत. ते मदत करणार नसतील तर ठाकरे गटाचे खासदार निधी देतील. अशा वक्तव्याने जनता चिडून उठेल आणि त्यांच्या उमेदवारांचा पराभवच करेल असे ते म्हणाले. राणे यांनी आपल्या विचाराचा उमेदवार निवडून न दिल्यास निधी न देण्याची धमकी प्रचार करताना दिली आहे. 

जयंत पाटलांच्या जन्माच्या आधीपासून सीमा वादाचा प्रश्न आहे,  मग जयंत पाटील कशाला प्रश्न पेटवतील? दोन वर्षात हा प्रश्न सुटणार नव्हता. मागील पाच वर्ष राज्यात भाजपची सत्ता होती, मग तेव्हा का प्रश्न सोडवला नाही? अशी विचारणा मुश्रीफ यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget