एक्स्प्लोर

Almatti dam Height : कर्नाटक अलमट्टीची उंची वाढवण्याच्या तयारीत; मंत्री दीपक केसरकर म्हणाले, राज्य सरकारचा अहवाल तयार, त्यांना सादर केला जाईल

Almatti dam Height : कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याबाबतचा अहवाल राज्य सरकारने तयार केल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

Almatti dam Height : कर्नाटक सरकारकडून कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याबाबत हालचाल सुरु असल्याने राज्य सरकारने अहवाल तयार केल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar on Almatti Dam Height) यांनी दिली. हा अहवाल कर्नाटक सरकारसोबत शेअर केला जाईल आणि धरणाची उंची न वाढवण्यासाठी विनंती केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. अलमट्टी धरणाची 519 वरून 524 मीटर करण्यासाठी प्रत्यक्ष तांत्रिक सल्लागाराची निविदा प्रसिद्ध झाल्याने महाराष्ट्राची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून कोणती भूमिका घेतली जाणार याकडे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी माहिती दिली. (Almatti dam Height)  

कृष्णा नदीवर कर्नाटकने बांधलेल्या अलमट्टी धरणातील पाणी पातळीमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला आतापर्यंत मोठा फटका बसला आहे. 2005 मध्ये अभूतपूर्व असा महापूर आला होता. 2010, 2015, 2019 आणि 2021 मध्येही महापूर आला. पुरामुळे लाखो हेक्टरवरील पीक नष्ट झाले होते. शिवाय हजारो लोक बेघर झाले होते. 

Almatti dam Height : उंची न वाढवण्याची विनंती करू

धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटकच्या योजनेवर बोलताना केसरकर म्हणाले की, “राज्य सरकारने अलमट्टीच्या पुराच्या परिणामाचा अहवाल तयार केला आहे. आम्ही तो कर्नाटकला देऊ आणि धरणाची उंची न वाढवण्याची विनंती करू. गेल्या काही वर्षांत आम्ही दोन्ही राज्यांमध्ये चांगला समन्वय पाहिला आहे, ज्यामुळे महापूर टळला आहे. आमच्या बाजूच्या नद्या चिंताजनक पातळीवर पोहोचल्यानंतर कर्नाटकने धरणातून पाणी सोडले आहे.” (Deepak Kesarkar on Almatti Dam Height)

कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची 519 मीटरवरून 524 मीटरपर्यंत वाढवणार आहे. नुकतेच कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र सरकार कर्नाटक सरकारला उंची वाढवू नये अशी विनंती करेल आणि तसा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र सरकार कर्नाटकला रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करेल.

Almatti dam Height : ऑगस्टअखेर 519.64 मीटर पाणीपातळी ठेवण्याची मर्यादा

अलमट्टी धरणाची उंची 524.256 मीटर इतकी वाढवण्यासाठी कर्नाटकला कृष्णा पाणी वाटप लवाद-2 कडून परवानगी मिळाली आहे. दुसरीकडे अलमट्टी धरणात सांगली, कोल्हापूर महापुराचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या मुकुंद घारे समितीने अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याचा उल्लेख केला आहे. या धरणात ऑगस्टअखेर 519.64 मीटर पाणीपातळी ठेवण्याची मर्यादा निश्चित केली आहे. या मर्यादेचे उल्लंघन झाल्याने 2005 मध्ये सांगली आणि कोल्हापुरातील महापूर स्थिती भीषण झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget