एक्स्प्लोर

Maharashta Loksabha Election : कोल्हापुरात गाडी सुसाट, पण सर्वाधिक चुरस असलेल्या बारामती-माढात पहिल्या चार तासात थंडा प्रतिसाद

Maharashta Loksabha Election : आज राज्यातील, लातूर, सांगली, बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, माढा, उस्मानाबाद (धाराशिव), रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग सातारा आणि सोलापूर या 11 जागांवर मतदान होत आहे.

Maharashta Loksabha Election Update : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 11 जागांचा यामध्ये समावेश आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये मतदानाचा अपेक्षित आकडा न गाठता आल्याने तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत मतदानाचा आकडा वाढवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून झंझावाती प्रचार करण्यात आला. 

बारामतीमध्ये पहिल्या चार तासांमध्ये थंडा प्रतिसाद

आज राज्यातील, लातूर, सांगली, बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, माढा, उस्मानाबाद (धाराशिव), रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग सातारा आणि सोलापूर या 11 जागांवर मतदान होत आहे. यामध्ये देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी सर्वाधिक हाय व्होल्टेज लढत रंगली आहे. कोल्हापूरमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा सामना आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना आहे.

11 लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक चुरस बारामती आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये आहे. मात्र, बारामतीमध्ये पहिल्या चार तासांमध्ये मतदानासाठी थंडा प्रतिसाद लाभल्याचे दिसून येत आहे. अकरा वाजेपर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये अवघ्या 14.64 टक्के मतदानाची नोंद झाली. मात्र, कोल्हापूरमध्ये 23.77% मतदानाची नोंद झाली. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघामध्ये 21.19 टक्के मतदानाची नोंद झाली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये 11 वाजेपर्यंत 20.74 टक्के मतदानाची नोंद  झाली. 

माढामध्ये पहिल्या चार तासांमध्ये 15.11 टक्के मतदानाची नोंद

माढामध्ये सुद्धा बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार असाच सामना रंगला होता. भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध करत धैर्यशील मोहिते पाटील यांनी हातात घेतलेली तुतारी यामुळे या मतदारसंघातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालं आहे. मात्र, पहिल्या चार तासामध्ये त्याचा परिणाम मतदानामध्ये झालेला दिसून आलेला नाही. माढामध्ये पहिल्या चार तासांमध्ये 15.11 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 

दरम्यान, महाविकास आघाडीकडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकहाती प्रचार केला. महायुतीकडू पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्यातील मंत्री प्रचारासाठी लागले होते. त्यामुळे या 11 मतदारसंघांमध्ये पहिल्या दोन टप्प्यांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक प्रचार करण्यात आला होता. यासाठी गल्ली ते दिल्ली अशी सूत्रे हलली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Rahul Gandhi | प्रचाराचा शेवटचा दिवस, एक है तो मोदी-अदानी सेफ है, राहुल गांधींची टीकाAnil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेरBIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget