एक्स्प्लोर

नांदणी मठाची 'माधुरी' परत येणार? वनताराचे CEO म्हणाले, कोल्हापूरकरांना सर्व सहकार्य करणार

Nandani Math Mahadevi Elephant : सर्वोच्च न्यायालयाने जर आदेश दिले तर आम्ही माधुरी हत्तीणीला परत नांदणी मठाला परत करू, त्यासाठी संपूर्ण सहकार्य करू असं वनताराचे सीईओंनी स्पष्ट केल्याचं पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.

कोल्हापूर : नांदणी मठाच्या हत्तीणीला वनतारामधून परत आणण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया करू, त्यासाठी वनताराही सकारात्मक आहे असं जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं. तर मठाची हत्तीण वनतारामध्ये नेण्यामध्ये आपली कोणतीही भूमिका नाही, जे काही झालं आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झाल्याचं वनताराच्या सीईओंनी स्पष्ट केलं.

नांदणी मठाची हत्तीण परत आणण्यासाठी कोल्हापुरात मोहीम सुरू झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठी अपडेट समोर येत आहे. शुक्रवारी वनताराचे सीईओ, नांदणी मठाचे मठाधीपती आणि कोल्हापुरातील नेते यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.

बैठकीत काय ठरलं?

कोल्हापुरातील नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वनतारामध्ये नेण्यात आली. त्यामुळे कोल्हापूरवासियांमध्ये एक असंतोष निर्माण झाल्याचं दिसून आलं. याच मुद्द्यावर वनताराचे सीईओ आणि मठाधीपती यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक झाली.

वनताराची यामध्ये कोणतीही भूमिका नाही

या सर्व घडामोडींमध्ये वनताराची कोणतीही भूमिका नसल्याचं सीईओंनी स्पष्ट केलं. वनताराने जे काही केलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केलं. त्यामुळे जर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आले तर वनताराकडून माधुरी हत्तीण परत देण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं.

कोर्टाच्या सूचना आल्या तर हत्तीण परत करू

नांदणी मठाने त्यासाठी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण कराव्यात आणि वनतारा त्यासाठी सर्व ते सहकार्य करेल असं वनताराच्या सीईओंनी स्पष्ट केलं. हवं असेल तर नांदणीच्या मठामध्ये वनताराचे एक युनिट सुरू करू. आम्हाला जर कोर्टाच्या सूचना आल्या तर आम्ही त्यापद्धतीने कार्यवाही करू. आमची यामध्य भूमिका शून्य आहे. लोकांमध्ये तीव्र आक्षेप आहे, पण आमचा या प्रकरणाशी संबंध नाही असं वनताराच्या सीईओंनी म्हटल्याचं प्रकाश आबिटकरांनी माहिती दिली.

कायदेशीर प्रक्रिया सुरू करू

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, "कोल्हापूरवासियांची भावना सर्वोच्च न्यायालयात मांडू. एखादा निर्णय ज्या वेळी सर्वोच्च न्यायालय घेते त्यावेळी फक्त जनभावना महत्त्वाची नाही. त्या जनभावनेइतकीच कायदेशीर प्रक्रियाही महत्त्वाची आहे. त्यामुळे एका बाजूला आपण कायदेशीर लढाई लढू. यासाठी वनताराचे सहकार्य राहील."

जैन धर्मियांच्या मनामध्ये त्या हत्तीणीविषयी असलेल्या भावनेला राजकारणाचे रुप येऊ नये, त्याचं राजकारण कुणीही करू नये असं आवाहन यावेळी पालकमंत्र्यांनी केलं.

ही बातमी वाचा:

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Embed widget