Kolhapur Uttar Vidhan Sabha : संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
Kolhapur Uttar Vidhan Sabha : खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांनी (Krishnaraaj Mahadik on Kolhapur Uttar Vidhan Sabha) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे.
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून (Kolhapur Uttar Vidhan Sabha) संधी मिळाल्यास लढण्यास तयार असल्याचे सांगत खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांनी (Krishnaraaj Mahadik on Kolhapur Uttar Vidhan Sabha) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. महायुतीमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतानाच आता कृष्णराज महाडिक यांनी जाहीरपणे भूमिका घेतल्याने कोल्हापूर उत्तर मतदारसंघ आता नेमका कोणाच्या वाट्याला जाणार? याची चर्चा सर्वाधिक रंगली आहे.
कोल्हापूरसाठी 25 कोटींचा निधी आणला
कोल्हापूर उत्तरमधून (Krishnaraaj Mahadik on Kolhapur Uttar Vidhan Sabha) इच्छुक असल्याचे सांगत कृष्णाराज महाडिक म्हणाले की, मला संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे. कृष्णराज यांनी सांगितले की, फेब्रुवारी महिन्यात 25 कोटींचा निधी मंजूर करून आणला होता. मात्र, पावसाळा असल्याने आम्हाला कामांना सुरुवात करण्यास उशीर झाला. परंतु येत्या महिन्यामध्ये सगळ्या कामांची सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर भीमा स्विमिंग टँकसाठी 28 कोटी रुपयाचा निधी आणला आहे. कोल्हापूरच्या कचरा व्यवस्थापनावर सुद्धा मी काम करत आहे. राज्य सरकारची यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. मी महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा, श्रीकांत शिंदे आणि खासदार धनंजय महाडिक यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
खासदार साहेबांकडून आदेश आला तर मी जबाबदारी घ्यायला तयार
त्यांनी पुढे सांगितले की, आगामी काळात विधानसभा निवडणूक सुद्धा येत आहे. मला अनेक लोकांनी त्या संदर्भात विचारणा केली आहे, पण आम्ही महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आहोत. जे काही वरिष्ठ पातळीवर निर्णय होतील आणि उमेदवार ठरवले जातील त्यांच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभा राहू. मला राजकीय क्षेत्रात संधी दिली आणि जर मला सांगितलं गेलं तर मी तयार आहे. मी समाजकार्य करत असताना लोकांकडून प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे माझे नाव आज विधानसभेसाठी चर्चेत आहे. मी माझं माझं काम करत आहे. वरिष्ठ पातळीवरून, खासदार साहेबांकडून आदेश आला तर मी ही जबाबदारी घ्यायला तयार असल्याचे कृष्णराज महाडिक म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या