एक्स्प्लोर

Krishnaraaj Mahadik  : खासदाराचा मुलगा बनला कचरा वेचक कर्मचारी, कोल्हापूरकरांना केलं आवाहन; विधानसभेचं मैदान मारण्यासाठी जोरदार तयारी

Krishnaraaj Mahadik VIDEO : कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापुरातील कचरा वेचक कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच नागरिकांनाही आवाहन केलं. 

कोल्हापूर : शहरातील कचऱ्याचा प्रश्न जाणून घेण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक चक्क कचरा उठाव कर्मचारी बनल्याचं दिसून आलं. त्यांनी घरोघरी जाऊन ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करण्याचं नागरिकांना आवाहन केलं. तसेच या निमित्ताने कृष्णराज महाडिक यांनी कचरा वेचक कर्मचाऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. खासदारांचा मुलगा चक्क कचरा उठाव कर्मचाऱ्याच्या वेशात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

कोल्हापूर शहरात अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये कचऱ्याचा प्रश्नदेखील मोठा आहे. दरम्यान कचरा उठाव करताना किंवा तो झूम प्रकल्पापर्यंत घेऊन जाताना काय हाल होतात हे कृष्णराज यांनी जाणून घेतलं. यावेळी नागरिकांच्या दारात जावून स्वतः कचरा गोळा केला. शिवाय नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचं आवाहन केलं. 

कृष्णराज महाडिक (Krishnaraaj Mahadik) यांचा कचरा वेचताना आणि नागरिकरांना आवाहन करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Krish Mahadik (@krishnaraajmahadik)

'करवीर उत्तर'साठी जोरदार तयारी

कृष्णराज महाडिक हे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव असून विधानसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे. या आधी ते कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. कोल्हापूर दक्षिणमधून महाडिक कुटुंबीयांचे कट्ट्रर विरोधक आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे आमदार आहेत. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक यांचीही तयारी सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळेच कृष्णराज महाडिक यांनी आता कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय. 

कृष्णराज महाडिक हे करवीर उत्तरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं स्वतः खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं आहे. या आधी माध्यमांधी बोलताना धनंजय महाडिक म्हणाले की, "कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर हे दोन वेळा आमदार राहिले आहेत. त्यामुळे त्यांचा दावा साहजिक असेल. पण पोटनिवडणुकीमध्ये भाजपने खूप मते घेतली आहेत. भाजपचे महेश जाधव, राहुल चिकोडे, नाना कदम यांच्याबरोबर कृष्णराज महाडिक देखील कोल्हापूर उत्तरमधून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आता कुणाला उमेदवारी द्यायची हे भाजपचे वरिष्ठ नेते ठरवतील. कोल्हापूर उत्तरचा उमेदवार हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजितदादा हे ठरवतील."

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला

कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   

नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा

राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 19 March 2025 7 AMABP Majha Marathi News Headlines 630 AM TOP Headlines 630AM 19 March 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सSpecial Report | Uddhav Thackeray VS Eknath Shinde | नागपूर बहाणा, ठाकरे निशाणा; कबरीच्या वादात उकरली गेली जुनी राजकीय मढीSpecial Report | Nagpur Violance Update | नागपूरमध्ये हिंसाचारानंतर आजची स्थिती कशी आहे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 

सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक

नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार

Embed widget