एक्स्प्लोर

Dhananjay Mahadik : 'कोल्हापूर उत्तर'वर भाजपचा दावा, धनंजय महाडिकांनी धाकट्या मुलाचं नाव पुढं केलं

Krishnaraaj Mahadik : कृष्णराज महाडिक हे फेमस यूट्यूबर असून कोल्हापुरातील तरूण वर्गात त्यांची चांगलीच क्रेझ आहे. यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी सुरू केली आहे. 

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी भाजप दावा करणार असून त्या ठिकाणी कृष्णराज महाडिक (Krishnaraaj Mahadik) देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत असं वक्तव्य भाजपचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिली. शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर हे दोनवेळा आमदार होते, त्यामुळे त्यांचा दावा सहाजिकच असेल, पण पोटनिवडणुकीत भाजपने मोठी मतं घेतली होती असंही धनंजय महाडिक म्हणाले. 

लोकसभेनंतर आता विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असून जिल्ह्यातील लक्षवेधी असलेल्या कोल्हापूर उत्तरचा उमेदवार कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक हे यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. 

कोल्हापूर उत्तरवर भाजपचा दावा

कोल्हापूर उत्तरच्या जागेवर बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, "कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर हे दोन वेळा आमदार राहिले आहेत. त्यामुळे त्यांचा दावा साहजिक असेल. पण पोटनिवडणुकीमध्ये भाजपने खूप मते घेतली आहेत. भाजपचे महेश जाधव, राहुल चिकोडे, नाना कदम यांच्याबरोबर कृष्णराज महाडिक देखील कोल्हापूर उत्तरमधून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आता कुणाला उमेदवारी द्यायची हे भाजपचे वरिष्ठ नेते ठरवतील. कोल्हापूर उत्तरचा उमेदवार हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजितदादा हे ठरवतील."

कृष्णराज महाडिक हे धनंजय महाडिक यांचे चिरंजीव असून त्यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे. या आधी ते कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. कोल्हापूर दक्षिणमधून महाडिक कुटुंबीयांचे कट्ट्रर विरोधक आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे आमदार आहेत. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक यांचीही तयारी सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळेच कृष्णराज महाडिक यांनी आता कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय. 

महायुतीत तिसरी आघाडी होणार नाही, अजित पवार हे महायुतीतून बाहेर जाणार नाहीत असा विश्वास धनंजय महाडिकांनी व्यक्त केला. 

कोल्हापुरात काही मंडळी वाद निर्माण करण्यासाठी आहेत. वाघनखं ही शिवाजी महाराजांच्या आहेत हे सरकारने जाहीर केलं आहे. शिवाजी महाराज यांचा आम्हाला अभिमान आहे असं धनंजय महाडिक म्हणाले. 

एमआयएम पक्षाने कोल्हापुरात मोर्चा काढायचा काय संबंध? आम्ही कोल्हापूरकर सक्षम आहोत, त्यांना कोल्हापुरात येऊ न देण्याची हिंदू एकताने घेतलेली भूमिका योग्य आहे असं धनंजय महाडिक म्हणाले. 

ही बातमी वाचा: 

 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
Iran vs Israel war: इराण-इस्रायल युद्धाचा भडका, राज्य सरकारचा मोठा निर्णय, इंडस्ट्रीसाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद, दोन दिवसात व्यावसायिक गॅसही बंद होणार?
इराण-इस्रायल युद्धाचा भडका, राज्य सरकारचा मोठा निर्णय, इंडस्ट्रीसाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद, दोन दिवसात व्यावसायिक गॅसही बंद होणार?
Kolhapur Crime Bribe case: सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget