Gokul Meeting LIVE : गोंधळ, हुर्रेबाजीत 'गोकुळ'ची वार्षिक सभा अवघ्या एका तासात गुंडाळली
Gokul Meeting LIVE : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा आज होत आहे. सभेसाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
LIVE
![Gokul Meeting LIVE : गोंधळ, हुर्रेबाजीत 'गोकुळ'ची वार्षिक सभा अवघ्या एका तासात गुंडाळली Gokul Meeting LIVE : गोंधळ, हुर्रेबाजीत 'गोकुळ'ची वार्षिक सभा अवघ्या एका तासात गुंडाळली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/0001aaad2397e70d3f6c6f7f33a73a0c169476158018983_original.jpeg)
Background
'अमुल' वाढावयला हातभार लावत आहेत; अरुण डोंगळेंचा शौमिका महाडिकांवर पलटवार
Gokul Annual Meeting : प्रचंड घोषणाबाजी आणि हुर्रेबाजीमध्ये गोकुळची आज (15 सप्टेंबर) वार्षिक सर्वसाधारण सभा अवघ्या एका तासामध्ये गुंडाळण्यात आली. सत्ताधारी गटाकडून सभासदांकडून उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आल्याचा दावा करण्यात आला, तर विरोधकांकडून ठरावधारकांना मत मांडू दिले गेले नाही, असा आरोप करण्यात आला. 'अमुल' वाढेल की नाही माहीत नाही. मात्र, अमुल वाढवायला हे लोक हातभार लावत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. सभासदांनी बोलायचं असताना आवाज दाबण्याचा प्रश्नच येत नाही. बोर्ड मिटींगला सातत्याने त्या गैरहजर असतात, आमच्याकडे नोंद असल्याचे अरुण डोंगळे म्हणाले.
बंटी पाटलांच्या आश्वासनांचं काय झालं? त्यांनीच उत्तर द्यावे, अध्यक्षांना पुढे कशासाठी करता; शौमिका महाडिकांचा सवाल
गोकुळ : गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नेहमीप्रमाणे सतेज पाटील आणि महाडिक समर्थकांकडून शक्तीप्रदर्शन आणि घोषणांचा कार्यक्रम झाला. त्यामुळे गोंधळामध्येच सभेला सुरुवात झाली. विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी या व्यासपीठावर न जाता सभासदांमध्ये आहेत. त्यांनी व्यासपीठाकडे मला जाण्याची संधी मिळाली नसल्याचा आरोप केला. ठरावधारकांना आत येऊ दिलं नाही, त्यामुळे उद्रेक झाल्याचा आरोपही त्यांनी. आम्ही शांततेत आलो होतो, पण तासभर ताटकळत उभे राहिलो. मला सन्मानाने बोलवल्यास मी व्यासपीठाकडे जाईन, असेही त्यांनी सांगितले. बंटी पाटील यांनी गेल्यावर्षी दिलेल्या आश्वासनाचं काय झालं? त्यांनीच उत्तर द्यावे, अध्यक्षांना पुढे कशासाठी करता असा सवालही त्यांनी केला.
गोकुळ सभा, सभासदांचे हित राहिलं बाजूला अन् महाडिक आणि बंटी पाटील समर्थकांची जोरदार घोषणाबाजी
गोकुळच्या सभेला सुरुवात होण्यापूर्वीच जोरदार घोषणाबाजी
गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात होण्यापूर्वीच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांकडून ठराव पाहूनच सभासदांना सोडले जात असताना यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सभासदांनी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनागोंदी निर्माण झाली. या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी सभेसाठी झाली आहे. सभादुपारी एक वाजता सुरू होणार आहे.
Gokul Annual General Meet : गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वीच मोठा गोंधळ
Gokul Annual General Meet : कोल्हापुरात आज गोकुळची 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडत आहे. परंतु या सभेपूर्वीच मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. बॅरिकेड्स तोडून सभासदांचा सभास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न सुरु आहे. या ठिकाणी पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सभासदांना आवरताना पोलिसांची दमछाक होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)