एक्स्प्लोर

Kolhapur Worst Road : संपूर्ण कोल्हापूर खड्ड्यात; खडी, मुरुमाच्या धुळीने डोळ्यातील 'बुबुळ' बाहेर येण्याची वेळ! महापालिकेला सोमवारी रिक्षांचा घेराओ

Kolhapur Worst Road : संपूर्ण कोल्हापूर शहरच खड्ड्यात गेल्याने परिस्थिती दिवसागणिक भयानक होत चालली आहे. शहरातील सर्वच घटकांना रस्त्यांची पार दैना झाल्याने दररोज मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.

Kolhapur Worst Road : संपूर्ण कोल्हापूर शहरच खड्ड्यात गेल्याने परिस्थिती दिवसागणिक भयानक होत चालली आहे. शहरातील सर्वच घटकांना रस्त्यांची पार दैना झाल्याने दररोज मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे वैतागलेल्या कोल्हापुरातील रिक्षा संघटनांनी एल्गार केला असून सोमवारी 31 ऑक्टोबर रोजी महापालिकेला घेराव घालणार आहेत. 

अॅड. बाबा इंदूलकर यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला असता ते म्हणाले की, चालणाऱ्यांपासून ते वाहनाधारकांपर्यंत सर्वांनाच कोल्हापूरमधील रस्त्यांचा त्रास होत आहे. त्यामुळे ज्यांना जीवाची काळजी आहे, त्यांनी यामध्ये सहभागी व्हावे. झोपलेलं सोंग घेतलं आहे त्यांना जागं करायचं आहे. या कोल्हापूर महापालिकेची कोणत्याही प्रकारची गुणवत्ता राहिलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेच्या प्रत्येक खात्यात घोटाळा झालेला आहे. देखेंगे, दिलाएंगे, कराएंगे इतकंच सुरु आहे. 

महापालिकेच्या हद्दीत लोकशाहीच शिल्लक राहिलेली नाही 

बाबा इंदलकर मनपाच्या कारभारावरून चांगलेच ताशेरे ओढले. ते पुढे म्हणाले की, कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत लोकशाहीच जिवंत राहिलेली नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये महापालिकेचं काहीच चांगलं झालेलं नाही. 

फडणवीसांचे वक्तव्य दुर्दैवी 

कोरोना महामारी, ओबीसी आरक्षण, राजकीय सत्तांतर आदी कारणांमुळे राज्यातील महापालिकेच्या निवडणूका होऊ शकलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका कधी होतील, हे देवालाच माहीत हे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे इंदुलकर म्हणाले.

खडी, मुरुमाच्या धुळीने डोळ्यातील 'बुबुळ' बाहेर येण्याची वेळ! 

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पाऊस थांबल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वातावरणात उष्णता जाणवत असल्याने रस्त्यांवरील ओलावा कमी होऊन पुन्हा एकदा धुळ उडण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील बऱ्याच मार्गावर पॅववर्कसाठी मुरुम आणि खडी पसरण्यात आली आहे. रस्ते वाळल्याने वाहने गेल्यानंतर वाहनांच्या धुळीचे लोट निर्माण होत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना विचित्र परिस्थितीला सामोरे जावं लागत आहे. 

रेसकोर्स नाक्यापासून पंधरा दिवसांच्या आत उखडला 

रेसकोर्स नाक्यापासून करण्यात आलेला रोडवर अवघ्या 15 दिवसांच्या आत खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ते करत आहेत की चेष्टा  करत आहेत हे समजण्यास मार्ग नाही. शहरातील खड्ड्यांमुळे दररोज अनेक अपघातही घडत आहेत. शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे व्यथा मांडूनही रस्त्यांमध्ये सुधारणा झालेली नाही. चांगले रस्ते कोल्हापूरकरांच्या नशिबीच नाहीत का? असाच काहीसा प्रश्न पडत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget