कोल्हापूर-बेळगाव प्रवास आता दोन तासात; कर्नाटक एसटी महामंडळाची दर अर्ध्या तासाला नॉन स्टॉप बस सेवा सुरू
Kolhapur to Belgaum Bus: महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटकच्या बस अधिक आरामदायी असल्याने या मार्गावर प्रवास करताना प्रवासी त्यालाच पसंती देत असल्याचं दिसून येतंय.
कोल्हापूर: कोल्हापूर ते बेळगाव किंवा बेळगाव ते कोल्हापूर (Kolhapur to Belgaum Bus) प्रवास आता अधिक गतिमान होणार असून कर्नाटक महामंडळाकडून (NWKRTC Karnataka ST) या मार्गावर दर अर्ध्या तासाला नॉन स्टॉप बससेवा सुरू करण्यात आली आहे. गुरुवारपासून ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर ते बेळगाव हा प्रवास आता केवळ दोन तासात होणार आहे.
कर्नाटक परिवहन मंडळातर्फे बेळगाव ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते बेळगाव नॉन स्टॉप बससेवा गुरुवार पासून सुरू करण्यात आली आहे. या नॉन स्टॉप बससेवेमुळे कोल्हापूरला जाणाऱ्या आणि बेळगावला येणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. सकाळी सात वाजता बेळगावहून कोल्हापूरला पहिली नॉन स्टॉप बस निघाली. कोल्हापूरहूनदेखील पहिली नॉन स्टॉप बेळगाव बस सकाळी सात वाजता निघाली. प्रत्येक अर्ध्या तासाला ही नॉन स्टॉप बस सेवा असल्याने प्रवाशांची चांगली सोय झाली आहे.
Kolhapur to Belgaum Bus: दिवसभरात 24 बस
सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.30 पर्यंत नॉन स्टॉप बस सेवा उपलब्ध असणार असून एकूण चोवीस बस दिवसभरात बेळगावहून कोल्हापूरला आणि कोल्हापूरहून बेळगावला येणार आहेत. कर्नाटक परिवहन मंडळाने सुरू केलेल्या नॉन स्टॉप बस सेवेमुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटक बस आरामदायी असल्याने प्रवासी कर्नाटक बसमधून प्रवास करण्याला पसंती देतात. आता बेळगाव ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते बेळगाव नॉन स्टॉप बस सेवा सुरू केल्यामुळे प्रवाशांची वेळेची बचत होणार आहे.
या मार्गावरील बस या आधी हत्तरगी, संकेश्वर , निपाणी गावात स्टॉप घेत होत्या. संकेश्वर गावात जायला तसेच निपाणी गावात जायला या बसला अधिक वेळ लागायचा. त्यामुळे या मार्गावर प्रवास करताना जास्त वेळ लागायचा. आता हत्तरगी, संकेश्र्वर आणि निपाणी गावात नॉन स्टॉप बस जाणार नसल्याने वेळ वाचणार आहे. त्यामुळे बेळगाव ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते बेळगाव नॉन स्टॉप बस केवळ दोन तासात पोचणार आहे. दर अर्ध्या तासाला बस सेवा उपलब्ध असणार आहे. पहिल्याच दिवशी प्रवाशांचा नॉन स्टॉप बस सेवेला चांगला प्रतिसाद लाभल्याचं दिसून आलं.
ही बातमी वाचा: