(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Airport : कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा आजपासून सुरु; कशी असणार सेवा अन् तिकिट दर किती असणार?
Kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर ते तिरुपती या मार्गावर आठवड्यातून मंगळवार, बुधवार आणि रविवार अशा तीन दिवसात ही सेवा उपलब्ध असणार आहे.
कोल्हापूर : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेली कोल्हापूर विमानतळावरून (Kolhapur Airport) कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा आता पुन्हा सुरू होणार आहे. आजपासून (31 मार्च) ही सेवा पूर्ववत होणार असल्याने भाविकांसह पर्यटक, उद्योजकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि तिरुपतीमधील बालाजी देवस्थानचा मोठा ऋणानुबंध आहे. दोन्हीकडे धार्मिक महत्त्व प्रचंड असल्याने या मार्गावर विमानसेवा पूर्वत करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने प्रवाशांकडून होत होती. त्यामुळे आता ही सेवा सुरू झाल्याने पर्यटकांची मोठी सोय होणार आहे.
#Kolhapur airport will be connected to #Tirupati again! @OfficialStarAir will fly #ERJ145 between Kolhapur 1110/Tirupati 1210- Tirupati 1225- Kolhapur 1345 wef 31/03/2024 on Tue, Wed & Sun.
— कोल्हापूर विमानतळ Kolhapur Airport (@aaikolhaairport) March 30, 2024
Note: STAR AIR schedule for tomorrow 31.03.2024 (#BLR sector cancelled)!!! pic.twitter.com/J2XN6idqVV
आठवड्यातून तीन दिवस सेवा
कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर ते तिरुपती या मार्गावर आठवड्यातून मंगळवार, बुधवार आणि रविवार अशा तीन दिवसात ही सेवा उपलब्ध असणार आहे.
Step into a realm where modernity meets history!
— Airports Authority of India (@AAI_Official) March 30, 2024
The recently unveiled New Terminal Building of #AAI’s #Kolhapur @aaikolhaairport has commenced operations on the 29th March 2024 and is welcoming passengers with its state-of-the-art amenities, intricate artworks and Maratha… pic.twitter.com/fwhdFBATU2
वेळ कशी असणार? तिकिट किती असणार
कोल्हापूर विमानतळावरून सकाळी 11 वाजता उड्डाण केल्यानंतर दुपारी 12:10 मिनिटांनी विमान ते तिरुपतीला पोहोचणार आहे. त्यानंतर परतीच्या प्रवासात तिरुपतीहून दुपारी साडेबारा वाजता विमान सुटून दुपारी पावणे दोनच्या सुमारास कोल्हापूर विमानतळावर पोहोचेल. त्यामुळे कोल्हापुरात तिरुपती ही दोन धार्मिक स्थळे या निमित्ताने पुन्हा एकदा जोडली जाणार आहेत. या सेवेला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. या मार्गावरील 2 हजार 999 रुपये तिकिट दर असेल.
कोल्हापूर विमानतळावरील आमच्या नवीन टर्मिनल इमारतीतून प्रवासी आवागमन सुरू केले आहे!
— कोल्हापूर विमानतळ Kolhapur Airport (@aaikolhaairport) March 29, 2024
हमने #कोल्हापुर हवाई अड्डे पर अपने नए टर्मिनल भवन से यात्री परिचालन शुरू कर दिया है!
We have commenced passenger operations from our #New_terminal_building at #Kolhapur airport!
More info in ALT. pic.twitter.com/iSf9xTLlI6
यापूर्वी इंडिगो कंपनीकडून कोल्हापूर-तिरुपती सेवा सुरू होती. मात्र, प्रतिसाद मिळाला नसल्याने सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर उद्योजक पर्यटकांची मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळे ही सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती.
इतर महत्वाच्या बातम्या