एक्स्प्लोर

Rajaram Sakhar Karkhana : सतेज पाटील-महाडिक वादाने टोक गाठलेल्या राजाराम साखर कारखान्यासाठी उद्या मतदान

Rajaram Sakhar Karkhana : उद्या रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत कारखान्यासाठी मतदान होणार आहे. या मतदानासाठी 10 केंद्रावर 580 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

Rajaram Sakhar Karkhana : निवडणूक रणधुमाळी सुरु होण्यापूर्वीच सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि ऐन प्रचारात आव्हानाची भाषा करत वाद थेट बिंदू चौकापर्यंत वाद घेऊन आलेल्या छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उद्या (23 एप्रिल) मतदान होत आहे. आज (22 एप्रिल) कसबा बावड्यात मतदारांना पैसे वाटप केल्याचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वाटप करणाऱ्याला मारहाण करतानाही व्हिडीओत दिसून येत होते. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानापर्यंत पडद्यामागून अनेक हालचाली घडून येणार आहेत, यात शंका नाही. जिल्ह्यातील साडेसहा तालुक्यातील कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या 112 गावांमध्ये सभा, मेळावा या माध्यमातून प्रचार करण्यात आला. सोशल मीडियाचाही दोन्ही गटाने तितक्याच ताकदीने वापर केला आहे. 

उद्या रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत कारखान्यासाठी मतदान होणार आहे. या मतदानासाठी 10 केंद्रावर 580 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आज निवडणुकीसाठी साहित्याचे वाटप करण्यात आले. मतदानावेळी सहा विभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे केंद्रे विभागून देण्यात आली आहेत. 

मतदानासाठी तगडा बंदोबस्त 

पोलिसांकडून या निवडणुकीसाठी प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सतेज पाटील यांचे होम ग्राऊंड असलेल्या बावड्यात, तर महाडिकांचे होम ग्राऊंड असलेल्या शिरोली पुलाचीमध्ये अतिरिक्त बंदोबस्त असणार आहे. मंगळवारी 25 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. गेल्या 28 वर्षांपासून राजाराम कारखान्यावर महाडिकांची सत्ता आहे. सतेज पाटील गटाकडून सत्तांतर करण्यासाठी ईर्ष्येने प्रचार केला गेला. महाडिकांनी सुद्धा सत्ता राखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. महाडिकांसाठी आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे, माने गटही प्रचारात दिसून आला.   

किती जागांसाठी निवडणूक होणार? 

राजाराम साखर कारखान्यासाठी संस्था गटातील एक व उर्वरित गटातील 20 अशा 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. संस्था गटातून सत्ताधारी गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक रिंगणात आहेत. संस्था गटातील 129 तर उत्पादक गटातील 13 हजार 409 असे 13 हजार 538 सभासद मतदानासाठी पात्र आहेत.

दोन्ही गटाकडून प्रचाराचे गाठले टोक 

या निवडणुकीसाठी दोन्ही गटाकडून अत्यंत ईर्ष्येने प्रचार झाला. दोन्ही गटातील राजकीय कुस्ती एका कारखान्याच्या निवडणुकीसाठी थेट बिंदू चौकापर्यंत येऊन पोहोचली. दोन्ही गटांकडून आव्हानाची भाषा झाली. एकेरी सुद्धा उल्लेख झाला. त्यामुळे आता मायबाप सभासद काय कौल देतात याचे उत्तर 25 एप्रिलला मिळणार आहे. सत्ताधारी गटाकडून महादेवराव महाडिक यांच्यासह अमल, खासदार धनंजय महाडिक, शौमिका महाडिक यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. आमदार डॉ. विनय कोरे, माजी खासदार निवेदिता माने, आमदार प्रकाश आवाडे गटाने सत्तारूढ आघाडीला पाठिंबा दिला आहे. विरोधी गटाकडून विरोधी गटांकडून आमदार सतेज पाटील, बंधू डॉ. संजय पाटील, आमदार ऋतुराज पाटील मैदानात होते.  

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत जाऊन 30 वर्षे लाटा मोजल्या नाहीत; रामराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्या पक्षात जाणार?
मुंबईत जाऊन 30 वर्षे लाटा मोजल्या नाहीत; रामराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्या पक्षात जाणार?
पडक्या घरातच पूरग्रस्त लाडक्या बहिणीनं केलं पालकमंत्र्याचं स्वागत; जयकुमार गोरे म्हणाले घर बांधून देतो
पडक्या घरातच पूरग्रस्त लाडक्या बहिणीनं केलं पालकमंत्र्याचं स्वागत; जयकुमार गोरे म्हणाले घर बांधून देतो
बदलापुरात शहराबाहेरील 17 हजार मतदार; शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख पुढे, म्हणाले, बोगस लोकांना चोप देऊ
बदलापुरात शहराबाहेरील 17 हजार मतदार; शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख पुढे, म्हणाले, बोगस लोकांना चोप देऊ
FPI: दिवाळीपूर्वी भारतासाठी गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, तीन महिन्यानंतर शेअर बाजारात मोठी गुंतवणूक
दिवाळीपूर्वी भारतासाठी गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, 3 महिन्यानंतर शेअर बाजारात कोट्यवधी गुंतवले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Pune Dog: हा भ्रष्टाचाराचा प्रकार, कंत्राटदारांच्या घशात 5 कोटी घालण्याचा घाट, पुणेकरांचा आरोप
Special Report Hydrogen Bus : 'एका बसची किंमत अडीच ते तीन कोटी', प्रदूषणमुक्तीसाठी पुण्यात हायड्रोजन बसची ट्रायल
Special Report Tejas : नाशिकमधून 'तेजस'चे ऐतिहासिक उड्डाण, हवाई दलाची ताकद वाढली
Special Report Uday Samant Mahayuti : महायुतीत पुन्हा कुरबुरी, उदय सामंतांचा मित्रपक्षांना थेट इशारा
Special Repor Shivsena VS BJP : निवडणूक आयोगाला सोडणार नाही, घोटाळे करणाऱ्यांना क्षमा नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत जाऊन 30 वर्षे लाटा मोजल्या नाहीत; रामराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्या पक्षात जाणार?
मुंबईत जाऊन 30 वर्षे लाटा मोजल्या नाहीत; रामराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्या पक्षात जाणार?
पडक्या घरातच पूरग्रस्त लाडक्या बहिणीनं केलं पालकमंत्र्याचं स्वागत; जयकुमार गोरे म्हणाले घर बांधून देतो
पडक्या घरातच पूरग्रस्त लाडक्या बहिणीनं केलं पालकमंत्र्याचं स्वागत; जयकुमार गोरे म्हणाले घर बांधून देतो
बदलापुरात शहराबाहेरील 17 हजार मतदार; शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख पुढे, म्हणाले, बोगस लोकांना चोप देऊ
बदलापुरात शहराबाहेरील 17 हजार मतदार; शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख पुढे, म्हणाले, बोगस लोकांना चोप देऊ
FPI: दिवाळीपूर्वी भारतासाठी गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, तीन महिन्यानंतर शेअर बाजारात मोठी गुंतवणूक
दिवाळीपूर्वी भारतासाठी गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, 3 महिन्यानंतर शेअर बाजारात कोट्यवधी गुंतवले
Team India : टॉप ऑर्डर फेल ते सरावाचा अभाव, टीम इंडियाचं पहिल्या वनडेत नेमकं काय चुकलं? पराभव 'या' कारणामुळं 
Team India : टॉप ऑर्डर फेल ते सरावाचा अभाव, टीम इंडियाचा  पहिल्या वनडेत पराभव 'या' कारणामुळं, जाणून घ्या 
Credit Score :  कर्ज लवकर मंजूर करुन घ्यायचं असल्यास क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा? जाणून घ्या सोपे पर्याय
कर्ज लवकर मंजूर करुन घ्यायचं असल्यास क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा? जाणून घ्या सोपे पर्याय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2025 | रविवार
राज ठाकरे हे कुशल संघटक, मात्र त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही, सुधीर मुनगंटीवारांची टीका
राज ठाकरे हे कुशल संघटक, मात्र त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही, सुधीर मुनगंटीवारांची टीका
Embed widget