(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur : 84 लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमवतो, तरीही पोट भरत नाही? असे सोशल मीडियात विचारणारा 'तत्वज्ञानी' सहाय्यक फौजदार लाच घेताना जाळ्यात!
फायन्सासमध्ये गेलेले वाहन परत मिळवून देण्यासाठी लाच घेताना जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार सोमनाथ देवराम चळचूक याला 10 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.
Kolhapur Police : माणूस दिसतो तसा कधीच नसतो ही म्हण अनादी काळापासून चालत असली, तरी आभासी जग झालेल्या सोशल मीडियावर व्यक्त होणारा, तर तुलना न केलेली बरी, असे नग पदोपदी आढळून येतात. आता असाच एक सोशल मीडियातील तत्वज्ञानी सहाय्यक फौजदार 15 हजारांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात सापडला आहे. फायन्सासमध्ये गेलेले वाहन परत मिळवून देण्यासाठी लाच घेताना जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार सोमनाथ देवराम चळचूक (वय 48 सध्या रा. जयसिंगपूर) याला 10 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. या घटनेनंतर कोल्हापूर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर पोलिस दलात लाचखोरीचे प्रमाणव वाढतच चालले आहे.
तक्रारदाराकडून फायनान्सचे कर्ज घेत ओमनी वाहन खरेदी केले होते. त्यानंतर ते वाहन संबंधित तक्रारदाराने उमळवाडमधील मित्राला विकले होते. मात्र, या वाहनावरील हप्ता न भरता आल्याने परस्पर व्यवहार विकले होते. त्यामुळे तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेत वाहन परत मिळण्यासाठी अर्ज केला होता. तक्रारदाराने अर्ज केल्यानंतर सोमनाथ चळचूकने 15 हजार लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने त्याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
सोशल मीडियावर ती पोस्ट प्रचंड व्हायरल!
या महाशयांनी डिसेंबर महिन्यात सोशल मीडियावर केलेली पोस्टही व्हायरल झाली आहे. 84 लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो, पण कुठलाच जीव उपाशी राहत नाही आणि माणूस पैसे कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही? अशी विचारणा करणारी पोस्ट 28 डिसेंबर 2022 रोजी केली होती. त्यामुळे या सहाय्यक फौजदाराची आता अस्सल कोल्हापुरी भाषेत सोशल मीडियात खिल्ली उडवली जात आहे. माणूस सोशल मिडियावर जसा दिसतो तसा नसतो, आता हाच लाचखोर पोलिस बघा, फेसबुकवर काय पोस्ट करतो आणि प्रत्यक्षात काय करतो. अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल झाल्या आहेत. अनेकांनी या पोस्टवरून जात कमेंट करत फौजदाराचा क्लास घेतला आहे.
तब्बल 8 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारीच अटकेत
दरम्यान, मार्च महिन्यामध्ये कोल्हापूर पोलिस (Kolhapur Police) दलातील पोलीस अधिकाऱ्यांनाच तब्बल 8 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील लाचखोर एपीआय आणि आणि कॉन्स्टेबलच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये 8 लाख रुपयांची लाच घेताना जुना राजवाडा पोलीस ठाण्याचा सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश म्हात्रे आणि कॉन्स्टेबल रुपेश कुंभार या दोघांना सांगली आणि कोल्हापूर येथील लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने मध्यरात्री अडीच वाजता सापळा रचून रंगेहाथ अटक केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या