एक्स्प्लोर

Kolhapur Rain update: कोल्हापुरात पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल, जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत

Kolhapur News: जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसाने विविध नद्यांवरील 75 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. बंधारे पाण्यात गेल्याने अन्य पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे.

Kolhapur Rain Update : कोल्हापूर (Kolhapur News) शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी उघडझाप केल्यानंतर आज (22 जुलै) शनिवारी पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसाने विविध नद्यांवरील 75 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. बंधारे पाण्यात गेल्याने अन्य पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा  वेगाने होत आहे. त्यामुळे नदीने इशारा पातळीकडे वाटचाल सुरु केली आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 36 फुट 4 इंचावर पोहोचली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फुट असून धोका पातळी 43 फूट आहे. एकूण 75 बंधारे पाण्याखाली आहेत.

आज सकाळपर्यंत 66 बंधारे पाण्याखाली होते. मात्र, पावसाने पुन्हा जोर पकडल्याने सायंकाळी चारपर्यंत आणखी 9 बंधारे पाण्याखाली गेले. बंधारे पाण्याखाली एसटीच्या सेवेवरही परिणाम झाला असून अनेक मार्गावर एसटी बंद करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख 24 राज्यमार्गांपैकी 5 मार्गांवर वाहतूक बंद आहे. जिल्हा मार्ग असलेल्या 122 पैकी 10 मार्ग बंद असल्याने एकूण 15 मार्गांवर वाहतूक बंद आहे. 

धरणांच्या पाण्यात वेगाने वाढ 

दरम्यान, राधानगरी धरणातील पाणीसाठ्यात गेल्या 24 तासात  साडे तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरणात आता 73.34 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्याचबरोबर कासारी, कडवी आणि कुंभी धरणातही 70 टक्के पाणीसाठा झाला आहे. वारणा धरणातही 64 टक्के पाणीसाठा झाला आहे. काळम्मावाडी धरणातही वेगाने साठा होत आहे. धरणात 9.31 टीएमसी पाणीसाठा झाला असून 36. 67 टक्के पाणीसाठा झाला आहे. 

जिल्ह्यातील कोणत्या मार्गावर एसटी बंद?

  • संभाजीनगर आगारातून रंकाळा ते चौके, रंकाळा ते वाशी आणि रंकाळा ते वाशी या मार्गावर गोट पुलावर पाणी आल्याने एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. 
  • गडहिंग्लज आगारातून भंडारा, तावरवाडी, ऐनापूरकडे जाणारी एसटी सेवा बंद आहे. 
  • चंदगड आगारातून हेरे, इब्राहिमपूर, पारगडकडे  जाणारी वाहतूक पूर्णत: बंद आहे 
  • आजरा आगारातून चंदगड, साळगाव, आजरा-चंदगड मार्गावरील गवसे पुलावर पाणी आल्याने वाहतूक वळवण्यात आली आहे. 

कोणत्या नदीवरील कोणता बंधारा पाण्याखाली?

  • पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
  • भोगावती नदी : हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे.
  • कासारी नदी : यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे व वालोली, बाजार भोगाव, पेंडाखळे
  • हिरण्यकेशी नदी : साळगाव, सुळेरान व चांदेवाडी, दांभीळ, ऐनापूर, निलजी 
  • घटप्रभा नदी : पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगाव, कानडे-सावर्डे व अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी
  • वेदगंगा नदी : निळपण, वाघापूर, कुरणी, वस्तवडे, म्हसवे, गारगोटी, सुरुपली व चिखली, गारगोटी, म्हसवे, सुक्याचीवाडी, शेणगाव
  • कुंभी नदी : कळे, शेणवडे, वेतवडे, मांडुकली, सांगशी, असळज 
  • वारणा नदी : चिंचोली, माणगाव, तांदुळवाडी, कोडोली, खोची 
  • कडवी नदी : भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव व सवते सावर्डे, सरुड पाटणे, 
  • धामणी नदी : सुळे, पनोरे, आंबडे
  • तुळशी नदी : बीड 
  • ताम्रपर्णी नदी : कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाही, काकरे, न्हावेली, कोवाड 
  • दुधगंगा नदी : दत्तवाडी, सुळकूड, सिद्धनेर्ली 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : मी कॉमन मॅन आहे,तुम्ही सुपरमॅन बनवा , शिंदे काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 05 November 2024Raju Latkar On Satej Patil : मी काँग्रेसी विचारांचा कार्यकर्ता, शाहू महाराजांनी मला न्याय दिलाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : :16 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Embed widget