एक्स्प्लोर

Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक धबधबे पर्यटनासाठी बंद; घरातून बाहेर पडण्यापूर्वी यादी पाहून घ्या

Kolhapur Rain Update: हौशी पर्यटकांकडून जीव धोक्यात घालून धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटन होत असल्याने प्रशासनाकडून भुदरगड तालुक्यातील पर्यटनस्थळी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) भुदरगड तालुक्यात रांगणा किल्ल्यावर जीव धोक्यात घालून हौशी पर्यटकाकडून झालेल्या प्रकारानंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. भुदरगड तालुक्यातील जुलै ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत रांगणा किल्ला, शिवडाव बुद्रुक येथील नाईकवाडी धबधबा व दोनवडे येथील सवतकडा धबधबा तसेच भुदरगड तालुक्यालगत असणाऱ्या तोरस्करवाडी धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. स्थानिकांना सुद्धा बंदी करण्यात आल्याची माहिती भुदरगड तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा तहसिलदार अश्विनी वरुटे-अडसूळ यांनी दिली आहे. 

पावसाळा संपेपर्यंत पर्यटनासाठी जाऊ नये

भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ल्यावर पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. रांगणा किल्ल्याच्या परिसरात पावसाळ्यामध्ये जाण्यासाठी अत्यंत बिकट मार्ग आहे. किल्ल्यावर जाताना वाटेत 5 ते 6 ओढे नाले आहेत. किल्ल्याच्या परिसरात नेटवर्क नसल्यामुळे मोबाईलद्वारे किंवा कोणत्याही प्रकारे संपर्क करता येत नाही. 18 जुलै रोजी रांगणा किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले 17 पर्यटक अडकले होते. त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. या घटनेची पुननावृत्ती होऊ नये किंवा एखादी दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळा संपेपर्यंत रांगणा किल्ल्याकडे तसेच शिवडाव बुद्रुक येथील नायकवाडी धबधबा व दोनवडे येथील सवतकडा धबधबा व नितवडे येथील तोरस्करवाडी धबधबा इत्यादी ठिकाणी असलेल्या पर्यटनस्थळांकडे पर्यटनासाठी जाऊ नये, असे आवाहन अडसूळ यांनी केले आहे.

दरम्यान, पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या बर्की धबधब्याकडेही पर्यटकांनी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुसळधार पावसाने कासारी नदी पात्राबाहेर पडल्याने ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. राऊतवाडी धबधब्याने सुद्धा रौद्ररुप धारण केलं आहे. जीव धोक्यात न घालता राऊतवाडी धबधब्याकडे जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सर्वदूर दमदार हजेरी लावली. त्यामुळे मोसमात प्रथमच पंचगंगा नदी बुधवारी रात्रीच्या अकराच्या सुमारास पात्राबाहेर पडली. पंचगंगेची इशारा पातळी 39 तर धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अत्यंत वेगाने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील जांबरे हा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख 15 प्रकल्पांपैकी 3 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. राधानगरी धरणात 62.61 टक्के साठा झाला आहे. धरणातून भोगावती नदी पात्रात 1200 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. काळम्मावाडी धरणामध्ये 29.47 टक्के पाणीसाठा झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख 122 जिल्हा आणि 24 राज्य मार्गांपैकी तीन जिल्हा आणिदोन राज्य मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 51 बंधारे पाण्याखाली आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yavatmal : शाळेच्या कामासाठी कंत्राटदाराकडून 80 हजारांची लाच मागितली, महिला सरपंचाला बेड्या, यवतमाळमधील घटना
शाळेच्या कामासाठी कंत्राटदाराकडून 80 हजारांची लाच मागितली, महिला सरपंचाला बेड्या, यवतमाळमधील घटना
Aadhaar Card New Rules : आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर एका क्लिकवर अपडेट होणार, नवा नियम लागू, जाणून घ्या
आधार कार्डच्या अपडेटसाठी अधिक पैसे मोजावे लागणार, नवा नियम लागू, जाणून घ्या
अजितदादांच्या तीन दशकांच्या एकहाती वर्चस्वाला भाजपचा शह? उपाध्यक्षासह मोहोळ गटाला 11 जागा, फडणवीसांनी ऑलिम्पिक असोसिएशनचा 'निकाल' लावला
अजितदादांच्या तीन दशकांच्या एकहाती वर्चस्वाला भाजपचा शह? उपाध्यक्षासह मोहोळ गटाला 11 जागा, फडणवीसांनी ऑलिम्पिक असोसिएशनचा 'निकाल' लावला
Gold Locker : एक तोळा, 10 तोळे, 50 तोळे, बँकेच्या लॉकरमध्ये किती सोनं ठेवता येतं? जाणून घ्या नियम
एक तोळा, 10 तोळे, 50 तोळे, बँकेच्या लॉकरमध्ये किती सोनं ठेवता येतं? जाणून घ्या नियम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics:मतदार यादीवरून MVA-भाजप आमनेसामने, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी Special Report
Voter List Row: 'माझ्या मतदारसंघात ९,५०० बोगस मतदार', काँग्रेस नेते Balasaheb Thorat यांचा गंभीर आरोप
Voter List Plot: 'माझ्या कुटुंबाची नावं मतदार यादीतून वगळण्याचा डाव', Uddhav Thackeray यांचा गंभीर आरोप
Satyacha Morcha: 'अॅनाकोंडाला कोंडावंच लागेल', मतदार याद्यांवरून Uddhav Thackeray सरकारवर बरसले
Maharashtra Politics:विरोधकांचा सत्याचा मोर्चा ते सत्ताधाऱ्यांचा मूक मोर्चा; दिवसभरात काय काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yavatmal : शाळेच्या कामासाठी कंत्राटदाराकडून 80 हजारांची लाच मागितली, महिला सरपंचाला बेड्या, यवतमाळमधील घटना
शाळेच्या कामासाठी कंत्राटदाराकडून 80 हजारांची लाच मागितली, महिला सरपंचाला बेड्या, यवतमाळमधील घटना
Aadhaar Card New Rules : आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर एका क्लिकवर अपडेट होणार, नवा नियम लागू, जाणून घ्या
आधार कार्डच्या अपडेटसाठी अधिक पैसे मोजावे लागणार, नवा नियम लागू, जाणून घ्या
अजितदादांच्या तीन दशकांच्या एकहाती वर्चस्वाला भाजपचा शह? उपाध्यक्षासह मोहोळ गटाला 11 जागा, फडणवीसांनी ऑलिम्पिक असोसिएशनचा 'निकाल' लावला
अजितदादांच्या तीन दशकांच्या एकहाती वर्चस्वाला भाजपचा शह? उपाध्यक्षासह मोहोळ गटाला 11 जागा, फडणवीसांनी ऑलिम्पिक असोसिएशनचा 'निकाल' लावला
Gold Locker : एक तोळा, 10 तोळे, 50 तोळे, बँकेच्या लॉकरमध्ये किती सोनं ठेवता येतं? जाणून घ्या नियम
एक तोळा, 10 तोळे, 50 तोळे, बँकेच्या लॉकरमध्ये किती सोनं ठेवता येतं? जाणून घ्या नियम
IND vs AUS : अर्शदीपला संधी, कुलदीप यादव बाहेर, टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टी 20 मध्ये कोणाला संधी देणार? जाणून घ्या संभाव्य प्लेईंग 11
अर्शदीपला संधी, कुलदीप यादव बाहेर, टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टी 20 मध्ये कोणाला संधी देणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2025 | शनिवार
Sanju Samson : संजू सॅमसन ऑस्ट्रेलियात असताना नवी अपडेट, राजस्थान रॉयल्सची साथ सोडणार? IPL मध्ये 'या' संघातून खेळण्याची शक्यता
संजू सॅमसनची आयपीएलमधील टीम बदलणार, राजस्थान रॉयल्स मोठ्या निर्णय घेण्याच्या तयारीत
Uddhav Thackeray: या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
Embed widget