एक्स्प्लोर

Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस; पंचगंगा नदी प्रथमच पात्राबाहेर, 51 बंधारे पाण्याखाली, कोणते मार्ग वाहतुकीसाठी बंद?

पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसाने ओढे, नाले भरुन वाहत आहेत. पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली आहे. पावसाळी पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यात (kolhapur News) सलग दुसऱ्या दिवशी सर्वदूर दमदार हजेरी लावली. त्यामुळे मोसमात प्रथमच पंचगंगा नदी बुधवारी रात्रीच्या अकराच्या सुमारास पात्राबाहेर पडली. पंचगंगेची इशारा पातळी 39 तर धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अत्यंत वेगाने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील जांबरे हा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे जिल्ह्यातील 15 पैकी 3 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. राधानगरी धरणात 62.61 टक्के साठा झाला आहे. धरणातून भोगावती नदी पात्रात 1200 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. काळम्मावाडी धरणामध्ये 29.47 टक्के पाणीसाठा झाला आहे.  

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसाने ओढे, नाल्यांसह ओहळ भरुन वाहत आहेत. पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळी पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख 122 जिल्हा आणि 24 राज्य मार्गांपैकी तीन जिल्हा व दोन राज्य मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वदूर पावसाने शेतीच्या कामांनी पुन्हा एकदा वेग घेतला आहे. 

कोणत्या नदीवरील कोणता बंधारा पाण्याखाली?

कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या दमदार जिल्ह्यातील विविध नद्यांवरील 51 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 

  • पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
  • भोगावती नदी : हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे.
  • कासारी नदी : यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे व वालोली, बाजार भोगाव, पेंडाखळे, करंजफेण
  • हिरण्यकेशी नदी : साळगाव, सुळेरान व चांदेवाडी, दांभीळ, ऐनापूर, निलजी 
  • घटप्रभा नदी : पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगाव, कानडे-सावर्डे व अडकूर
  • वेदगंगा नदी : निळपण, वाघापूर, कुरणी, वस्तवडे, म्हसवे, गारगोटी, सुरुपली व चिखली.
  • कुंभी नदी : कळे, शेणवडे, वेतवडे, मांडुकली 
  • वारणा नदी : चिंचोली, माणगाव, तांदुळवाडी
  • कडवी नदी : भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव व सवते सावर्डे
  • धामणी नदी : सुळे
  • तुळशी नदी : बीड 

अतिवृष्टीमुळे कोण मार्ग बंद आणि पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु? 

  • करवीर तालुक्यातील शिंगणापूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद, आंबेवाडी, चिखली वाहतूक सुरु
  • चंदगड तालुक्यातील इब्राहिमपूर पुलावर पाणी आल्याने रस्ता बंद, कुरणी, गवसे, अडकूर मार्गे वाहतूक सुरु
  • आजरा तालुक्यात हिरण्यकेशी नदीवर बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद, ही वाहतूक बाचणी, पेरनोळी मार्गे सुरु
  • शिरोळ तालुक्यात शिरोळ बंधाऱ्यावर पाणी आल्याने शिरोळ, कुरुंदवाड या मार्गावरुन वाहतूक सुरु
  • गगनबावडा येथील मोरीवर पाणी आल्याने रस्ता बंद, पर्यायी मार्ग नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget