एक्स्प्लोर

Chandoli Dam : चांदोली धरणावर कोल्हापूर-सांगली पोलिसांची चौकी, सुरक्षा मात्र 'राम भरोसे'; दहशतवाद्यांनी रेकी केल्यानंतरचं चित्र 

Pune Terrorist News : पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांनी चांदोली धरणाची रेकी केल्याचं कबुल केलं आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली पोलिस दलात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. 

Chandoli Dam News : पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांनी आपण कोल्हापूर जिल्ह्यातील चांदोली धरणाची आणि चांदोली अभयारण्याची रेकी केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पाटबंधारे विभाग आणि पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पुणे पोलिसांनी मोटार सायकल चोरीच्या संशयावरून मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद साकी या दोन दहशतवाद्यांना अटक केली. त्यानंतर केलेल्या तपासात या दोघांनी आपण चांदोली धरण परिसरात रेकी केल्याची कबुली दिली. यानंतर एबीपी माझाने चांदोली धरणाच्या सुरक्षेचा आढावा घेतला. कोल्हापूर पोलीस आणि सांगली पोलिसांच्या चौक्या धरणाच्या उत्तर आणि पश्चिम दिशेला आहेत. सगळ्यात आधी कोल्हापूर पोलिसांच्या चौकीत गेल्यानंतर तर पोलीस कर्मचारी निवांत विश्रांती घेत होते. चार पैकी एकच कर्मचारी एका वेळी कार्यरत असल्याचं चित्र आहे. 

धरणाच्या सुरुवातीलाच सांगली पोलिसांची चौकी आहे. मात्र त्याठिकाणी एकच कर्मचारी आहे. चांदोलीत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण आहे. अनेक मार्गांनी धरणावर नागरिक पोहचल्याचे अनेक वेळा समोर आलं आहे आणि या धरणाची सुरक्षा काही मोजक्या कर्मचाऱ्यांवर आहे. पाटबंधारे विभागाचे कर्मचारी देखील केवळ 12 आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील शस्त्रधारी पोलीस 24 तास पहारा देत आहेत अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पण प्रत्यक्ष चित्र मात्र वेगळंच आहे.

चांदोली धरण आणि चांदोली अभयारण्य परिसर खूप मोठा आहे. मात्र इथं केवळ सात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. दहशतवाद्यांनी नेमकी कुठं रेकी केली? काय केलं हे समोर येईलच. पण आपण आपल्या बाजूनं किती तयारीत आहोत हे आज चांदोली धरणावर गेल्यानंतर दिसून आलं.

दरम्यान, पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे आणि परिसरातील सुनसान जागी स्फोट करण्यासाठी बॉम्बस्फोट (Bomb Blast) करण्याची प्रॅक्टिस केल्याचं एटीएसच्या (ATS) तपासात समोर आलं आहे. दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती एटीएसने कोर्टात दाखल केलेल्या अहवालात नमूद केली आहे. दरम्यान त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याची (यूएपीए) कलमवाढ करण्यात आली आहे. 

मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युसुफ या दोन दहशतवाद्यांना मागील सोमवारी मध्यरात्री गस्तीवर असलेल्या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सनी संशयास्पद हालचाली जाणवल्याने पकडले. यावेळी त्यांचा तिसरा साथीदार मोहम्मद शहनवाज आलम हा यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाला. 

ही बातमी वाचा:

  • Pune Crime News : पुण्यात 'ते' दोन अतिरेकी कशासाठी आले होते? त्यांचा प्लॅन काय होता? पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget