![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kolhapur News : कोल्हापुरात गणेशोत्सवात धक्कादायक घटनांची मालिका सुरुच; आता मिरवुणकीत नाचताना टेम्पोवरून पडल्याने एक गंभीर
गणपतीची आगमन मिरवणूक सुरू होती. यावेळी युवक डीजेच्या तालावर थिरकत होती. दिनेश हाती झेंडा घेत थांबलेल्या टेम्पोवर चढला. टेम्पोवर चढून तो झेंडा फिरवून नाचत असताना त्याचा पाय घसरून खाली पडला.
![Kolhapur News : कोल्हापुरात गणेशोत्सवात धक्कादायक घटनांची मालिका सुरुच; आता मिरवुणकीत नाचताना टेम्पोवरून पडल्याने एक गंभीर Kolhapur news serious one due to falling off the tempo while dancing in ganesh arrival Miravnuk Kolhapur News : कोल्हापुरात गणेशोत्सवात धक्कादायक घटनांची मालिका सुरुच; आता मिरवुणकीत नाचताना टेम्पोवरून पडल्याने एक गंभीर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/21/7913d95873e08c4f04389ad31c43de661695282622409736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात (Kolhapur News) गणेशोत्सवासाठी मोठ्या उत्साहात धामधूम सुरु असतानाच धक्कादायक घटनांची मालिका सुरुच आहे. गणेश भक्ताचा दोन्ही पाय घसरून डोक्यावर पडल्याने झालेला दुर्दैवी मृत्यू ताजा असतानाच आगमन मिरवणुकीवेळी टेम्पोवर उभे राहून नाचताना पडल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दिनेश विजय शिंदे (वय 26 रा. रिलायन्स मॉलजवळ, लक्ष्मीपुरी कोल्हापूर) असे त्या गणेश भक्ताचे नाव आहे. त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. बुधवारी रात्री ही घटना घडली.
झेंडा घेऊन नाचताना टेम्पोवरून खाली कोसळला
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात डाॅल्बी दणदणाटात आगमन मिरवणुका सुरु होत्या. बुधवारी (20 सप्टेंबर) लक्ष्मीपुरीतील मॉलजवळ असणाऱ्या एकता ग्रुपच्या गणपतीची आगमन मिरवणूक सुरू होती. यावेळी युवक डीजेच्या तालावर थिरकत होती. दिनेश हाती झेंडा घेत थांबलेल्या टेम्पोवर चढला. टेम्पोवर चढून तो झेंडा फिरवून नाचत असताना त्याचा पाय घसरून खाली पडला. यामुळे डोक्याला मार लागला. कार्यकर्त्यांनी त्याला तातडीने सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले.
डोक्यावर पडल्याने भक्ताचा करुण अंत
दुसरीकडे, मुंबईतून सुट्टी घेऊन गावी आलेल्या गणेशभक्ताचा बाप्पाचे स्वागत करताना दारात पाय घसरून डोक्यावर पडल्याने करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना आजरा तालुक्यातील बोलकेवाडीत घडली. सचिन शिवाजी सुतार (वय 38) असे दुर्दैवी गणेशभक्ताचे नाव आहे. दोन्ही पाय घसरून डोक्यावर पडल्याने गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
नेमका प्रसंग काय घडला?
सचिन मुंबईत खासगी कंपनीत नोकरीस होते. पत्नी आणि मुलाला मुंबईत ठेवून ते गणेशोत्सवासाठी सोमवारी गावी आले होते. मंगळवारी बाप्पांची मूर्ती आणण्यासाठी ते मित्रासोबत गेले होते. त्यांचा गणपती मित्र घेऊन आल्यानंतर दारात पोहोचले. गणपती स्वागत करून घरात घेण्यासाठी ते आईला हाक मारत धावत घरी गेले. त्यावेळीच त्यांचा पाय फरशीवरून घसरल्याने ते जोरात डोक्यावर पडले. यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने आजऱ्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दोन दिवसांनी मुंबईला परत येतो, असे सांगून गावी आलेल्या सचिन यांच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)