Kolhapur Crime : एएस ट्रेडर्सच्या म्होरक्याला गणपती पावलाच नाही; हजारो कोटींचा चुना लावणाऱ्या लोहितसिंहच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : गणपतीचे दर्शन घेण्यासाठी तो मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
कोल्हापूर : गुंतवणूकदारांची सुमारे तीन हजार कोटी रुपयांची फसवणूक करून गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या एएस ट्रेडर्स कंपनीचा प्रमुख आणि मुख्य सूत्रधार लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार (रा. पलूस, जि. सांगली) याच्या अखेर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. कोल्हापूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्य सापळा रचून जेरबंद केले. म्होरक्याच गळाला लागल्याने या हजारो कोटी रुपयांच्या फसवणुकीचा उलघडा होण्याची शक्यता आहे. गणपतीचे दर्शन घेण्यासाठी तो मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक
कमी कालावधीत भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेतलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम ए एस ट्रेडर्स कंपनीने गुंतवणूकदारांना परत केली नाही. ऑक्टोबर 2022 पासून परतावे मिळणे बंद झाल्याने गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेतली. नोव्हेंबर 2022 मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात ए एस ट्रेडर्स कंपनीसह 27 संचालक आणि एजंटवर गुन्हे दाखल झाले. तेव्हापासून कंपनीचा प्रमुख आणि फसवणुकीच्या मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार अटक टाळण्यासाठी धावपळ करीत होता. सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने स्वतःहून पोलिसात हजार होणार असल्याची माहिती ऑनलाइन मीटिंगद्वारे गुंतवणूकदारांना दिली होती. मात्र, पोलिसांपासून पळ काढत होता.
आतापर्यंत सात जणांना अटक
म्होरक्या लोहितसिंग सुभेदारसह 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुवर्णा श्रीरंग सरनाईक, (रा. हिराश्री लेक सिटी, बंगलो नं.६, अंबाई टैंक जवळ, रंकाळा, कोल्हापूर (संचालक) 2) बाळासो कृष्णात धनगर (वय 55 रा. गल्ली नं. 5, बाबु पार्क, बहिरेवाडी ता. पन्हाळा जिल्हा कोल्हापूर, एजंट) 3) बाबासो भुपाल धनगर (वय 30,रा. रेणुका मंदीर जवळ, धनगर गल्ली, मु.पो. नेली ता. करवीर, जिल्हा कोल्हापुर (संचालक) 4) अमित अरूण शिंदे (वय 47, रा. सिलव्हर ग्लेड्स अपार्टमेंन्ट, फ्लॅट नं.WA/००२, मेनन बंगल्या शेजारी, लिशा हॉटेल जवळ, कोल्हापुर (एजंट) 5) आशिष बाबासाहेब गावडे (वय 40, रा. 905, ग्रॅन्ड व्युव 7, फेज 4, आंबेगांव बुद्रुक, पुणे (एजंट) 6) श्रृतिका वसंतराव सावेकर/ परीट (वय 32, रा. फ्लॅट नं.403, गुरुप्रसाद हाईट्स, नागाळा पार्क, कोल्हापूर (कंपनी अॅडमिन) 7) साहेबराव सुबराव शेळके (वय 59 रा. प्लॉट नं. 26, महालक्ष्मी कॉलनी, सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर मुळ गांव मोहळ, जिल्हा सोलापुर (एजंट) यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींकडून मुद्देमाल जप्तीची प्रक्रिया सुरु
आरोपींकडून आतापर्यंत्या तपासात नवी मुंबई शहरामध्ये आरोपी बाबासो धनगर आणि आरोपी बाबु कृष्णा हजारे यांनी खरेदी केलेले एकूण 6 फ्लॅट व वंदुर ता.कागल येथील 5 एकर जमीन, उजळाईवाडी, मुडशिंगी, के. आय.टी कॉलेज जवळील एकूण 3 प्लॉट, दोन दुचाकी मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आरोपी अमित शिंदे याचे कदमवाडी कोल्हापूर येथील 1 पॅन्ट हाऊस, 1 फ्लॅट, पाडळी येथील 12 गुंठे जागा, पळसंबे ता. गगनबावडा येथील 8 एकर जमीन, तसेच बाबासो धनगरचे चार चाकी, दुचाकी वाहने. श्रुतिका सावेकरचे 6 लाख रुपयाचे दागिणे, तसेच लोहीतसिंग सुभेदारची पत्नीकडून 25 लाख रुपयांचे दागिने व अडीच लाख रुपयांचे डायमंड हस्तगत करण्यात आले आहेत.
जुलै महिन्यापासून 12 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा शोध लावला असून जप्तीची प्रक्रीया सुरु आहे. तसेच एएस ट्रेडर्स व तिचे सलग्न उपकंपन्यांची बँक खाती सिज करुन त्यावरील 3 कोटी 96 लाख रुपये सिज करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलिस महेंद्र पंडित, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, आर्थिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शना खाली आर्थिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक कारंडे, सहायक फौजदार वरक, उंडाळे, पो. हवालदार सावंत, प्रविण चव्हाण यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या