एक्स्प्लोर

Kolhapur News: अवघ्या 30 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी केलेलं पॅचवर्क 'चमचाभर' पावसातच उखडले; स्पीडब्रेकरवरील पट्टेही गायब

सीएम एकनाथ शिंदे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी कोल्हापुरात येणार म्हटल्यावर गुडघाभर खड्ड्यात गेलेल्या हाॅकी स्टेडियम ते निर्मिती काॅर्नर मार्गावर अतिशय वेगात आणि तातडीने डागडूजी करण्यात आली होती.

Kolhapur Road: कोल्हापूर मनपा प्रशासनाला कोणी वालीच नसल्याने शहराची अवस्था दिवसागणिक भयानक होत चालली आहे. मनपाकडून दिखाव्यासाठी जे काम केलं जातं ते सुद्धा किती थुकरट आणि दर्जाहीन आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापुरात फक्त मंडप घालण्यासाठी 94 लाख रुपये खर्च केलेला 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम 13 जूनला पार पडला. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा जुंपण्यात आली होती. लाभार्थींना कार्यक्रमासाठी जाग्यावर आल्याशिवाय लाभ मिळणार नाही, अशी दमवजा चिट्टी देऊनच कार्यक्रमाला हजर राहण्याचे फर्मान काढण्यात आले होते.

एक महिन्याच्या आत खडी उखडली

या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी कोल्हापुरात येणार म्हटल्यावर गुडघाभर खड्ड्यात गेलेल्या हाॅकी स्टेडियम ते निर्मिती काॅर्नर मार्गावर अतिशय वेगात आणि तातडीने डागडूजी करण्यात आली होती. मात्र, कोल्हापुरात चमचाभर पाऊस पडायच्या आतच तत्परतेनं केलेलं पॅचवर्क करून एक महिनाही पूर्ण होत नाही तोपर्यंतच हाॅकी स्टेडियम चौकात उखडून खडी बाजूला गेली आहे, तर पुन्हा खड्डा पडला आहे. त्यामुळे ब्रम्हांडात नसेल, असा कोल्हापूर महानगरपालिकेच्या कामाचा दर्जा एकदा सिद्ध झाला आहे. आता याच मार्गावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी वारी करावी, जेणेकरून महापालिकेला जाग येईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. महापालिकेकडून करण्यात आलेल्या तातडीच्या कामाकडे एबीपी माझाने लक्ष वेधताना मग बाकी कोल्हापूरकर हाडामासाची माणसं नाहीत? अशी विचारणा करत लक्ष वेधले होते. 

कामाच्या दर्जावर शहर अभियंता म्हणतात...

अवघ्या 30 दिवसांच्या आत पॅचवर्क उखडण्यात आल्याने एबीपी माझाने शहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्याशी संपर्क साधता त्यांनी संबंधित ठेकेदाराकडून न करता बांधकाम विभागाकडून करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच उखडलेल्या पॅचवर्कची पाहणी करू, असे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आम्ही काम करून घेतले होते, त्यामुळे आम्ही पाहणी करून घेतो. आम्ही बेसवर माल घेतला होता, आम्ही पाहणी करून घेऊ. बांधकाम विभागाकडून हे काम करण्यात आले होते. 

दरम्यान, हाॅकी स्टेडियम चौकापासून ते निर्मिती काॅर्नरपर्यंत या मार्गावर जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. मात्र, शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री त्याच मार्गावरुन येणार असल्याने या मार्गातील जेवढे स्पीड बेकर आहेत त्या स्पीड ब्रेकरवर तातडीने पांढरे पट्टे मारण्यात आले, ते पट्टे सुद्धा आता निर्मिती काॅर्नरवरील स्पीडब्रेकरवरून गायब झाले आहेत. दोन दोन फूट वर आलेल्या दोन चॅनेलला सुद्धा चांगल्या पद्धतीने कव्हर करून घेण्यात आले. ते सुद्धा आता उखडण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्याचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांचा ताफा शिवाजी विद्यापीठ चौक-सायबर चौक- राजेंद्रनगर चौक- आयसोलेशन हाॅस्पिटल- हाॅकी स्टेडियम चौकातून डावे वळण घेत निर्मिती काॅर्नर चौक आणि तेथून कार्यक्रम असलेल्या तपोवन मैदानात पोहोचला. (शिवाजी विद्यापीठ चौकापासून हाॅकी स्टेडियमपर्यंतचा रस्ता सुस्थितीत आहे) 

कोल्हापूर शहरातंर्गत रस्ते विकास प्रकल्पातून केलेल्या 49 किमी रस्त्यांचा आणि अन्य योजनेतून केलेल्या सुमारे दीडशे किमी रस्त्यांचा किमान अपवाद वगळता कोल्हापूर शहरात रस्ते कसे असावेत यापेक्षा ते कसे नसावेत असे एकापेक्षा एक नमुनेदार रस्ते कोल्हापूर शहरात आहेत. या सर्व रस्त्यांमध्ये गुडघाभर खड्डे, फुट दोन फुट वर आलेली ड्रेनेजची चॅनेल यामुळे प्रवास करायचा की नाही? असा प्रश्न रस्त्यातील ड्रेनेज पाहून पडतो. ही भयंकर परिस्थिती एका बाजूला असताना शहरामध्ये गॅस पाईपलाईन, ड्रेनेज लाईनसाठी, पाणीपुरवठा करणाऱ्या लाईनचे लिकेज काढण्यासाठी रस्त्यांची खुदाई करण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी बैठक, वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदार फडणवीसांचं अभिनंदन करणारDevendra Fadnavis Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री! विधीमंडळ परिसरात जल्लोषSantosh Bangar On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, संतोष बांगर काय म्हणाले?Devendra Fadnavis Maharashtra CM : फडणवीसांची नेतेपदी निवड,सभागृहात काय काय घडलं? UNCUT VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
Embed widget