एक्स्प्लोर

Kolhapur News: आधी संभाजी भिडे आणि आता भाजपकडून 15 ऑगस्टला तिरंग्यासोबत भगवा भडकवण्याचे फर्मान!

Kolhapur : राष्ट्रध्वज हा तिरंगा आहे, सोबत भगवा ध्वज फडकवा. शाळेमध्ये हिंदूनी टिकली लावली, दोरा बांधला तर अडवणूक होत आहे.  इतर धर्माची मात्र अडवणूक केली जात नसल्याचे भाजप नेते विक्रम पावसकर म्हणाले.

कोल्हापूर : आंबे खाण्यापासून ते टिकली लावण्यापर्यंत ते पार महापुरुषांच्या कर्तृत्वाचा अपमान करण्यापर्यंत गेल्या काही दिवसांपासून बेताल वक्तव्यांची मालिकाच लावलेल्या संभाजी भिडे यांच्याकडून 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी भगवा फडकवण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. आता याच सुरामध्ये भाजपकडून भाजपनेही सूर मिसळला आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी कोल्हापुरात बोलताना 15 ऑगस्टला तिरंगा शेजारी भगवा ध्वज प्रत्येकाने लावावा, असे आवाहन केले आहे. त्यामुळे भिडेंनंतर भाजपकडूनही भगवा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पावसकर म्हणाले की, तिरंग्याला जेवढा मान तेवढाच भगव्याला मान आहे. येणाऱ्या काळात तिरंग्या बरोबर भगवा फडकवला तरी हरकत नाही. पूर्वजांपासून भगवा ध्वज चालत आला आहे. राष्ट्रध्वज हा तिरंगा आहे, सोबत भगवा ध्वज फडकवा. शाळेमध्ये हिंदूनी टिकली लावली, दोरा बांधला तर अडवणूक होत आहे.  इतर धर्माची मात्र अडवणूक केली जात नाही. 

लोकसभेसाठी जोमाने कामाला लागा

दरम्यान, आज (11 ऑगस्ट) लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत भाजपची कोल्हापूर, हातकणंगले विभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. लोकसभा प्रवास योजना महाराष्ट्र प्रमुख माजी मंत्री बाळा भेगडे यांनी लोकसभा कोअर टीम व विधानसभा प्रमुखांना मार्गदर्शन केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशा सूचना केल्या. प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी कोल्हापूर ग्रामीण मंडल अध्यक्ष निवडीसंदर्भात तालुका निहाय पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन प्रत्येकाचे मत जाणून घेतले.

आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये नवमतदार नोंदणी, वॉर रूम, निवडणूक विश्लेषण, आगामी काळात विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांचे पक्ष प्रवेश यांच्यासह मोदी @9 कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसभेमध्ये झालेले घर घर संपर्क अभियान, व्यापारी संमेलन, प्रभावी व्यक्तींच्या भेटी, घर घर तिरंगा, मन की बात, मेरी माटी, मेरा देश, विभाजन विभीषिका, तिरंगा रेली, अशा सर्व गोष्टींचा अंतर्भाव बैठकीत घेण्यात आला. आगामी निवडणूक कोणासोबत लढवली जाईल याचा निर्णय प्रदेश स्तरावर प्रमुख नेतेमंडळी घेतील ,परंतु पक्ष संघटना जास्तीत जास्त मजबूत करून पक्षकार्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभेतील विधानसभा प्रमुखांनी आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये झालेल्या संघटनात्मक कामांची माहिती यावेळी सांगितली.  

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget