(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur municipal corporation elections 2022 : कोल्हापूर मनपा प्रभाग क्रमांक 13 शाहूपुरी, बागल चौक परिसर
Kolhapur : कोल्हापूर मनपा प्रभाग क्रमांक 13 मध्ये शहरातील व्यापारपेठ असल्याने नेहमीच वर्दळीचा भाग असतो. त्यामुळे अरुंद रस्त्यांमुळे नेहमीच वाहतूक कोंडी या प्रभागातून दिसून येते.
Kolhapur municipal corporation elections 2022 : कोल्हापूर मनपा प्रभाग क्रमांक 13 मध्ये शहरातील व्यापारपेठ असल्याने नेहमीच वर्दळीचा भाग असतो. त्यामुळे अरुंद रस्त्यांमुळे नेहमीच वाहतूक कोंडी या प्रभागातून दिसून येते. महापूर आला हा प्रभाग पूर्णत: पाण्यात अशीही विदारक परिस्थिती आहे.
प्रभाग क्रमांक 10 मध्ये समावेश असलेला भाग
गाडी अड्डा, रिलायन्स माॅल, संभाजी पूल, शाहूपुरी तालीम परिसर, बागल चौक, शहाजी लाॅ काॅलेज परिसर, साईक्स एक्सटेंशन, राजाराम हाॅल गार्डन, जगदाळे हाॅल, मातंग वसाहत, आर्यविन ख्रिश्चन हायस्कूल, केडीसी बँक, जयप्रकाश नारायण गार्डन, मुस्लीम दफनभूमी, बागल चौक, बीटी काॅलेज, शाहूपुरी गवत मंडई आदी भाग
प्रभाग 13 मध्ये आरक्षण
प्रभाग क्रमांक 13 मध्ये 13 अ अनूसुचित जाती (महिला), 13 ब सर्वसाधारण (महिला) 13 क सर्वसाधारण अशा पद्धतीने आहे.
प्रभागातील सद्यस्थिती काय
या प्रभागातून आगामी निवडणुकीसाठी संजय मोहिते, संदीप कवाळे, राहुल चव्हाण, पुजा नाईकनवरे, अमर समर्थ, पूनम काटे, अमित टिक्के, सुनील सनक्के, आजम जमादार, रमेश पुरेकर आदी इच्छूक आहेत.
वाॅर्ड रचना कशी आहे?
प्रभाग क्रमांक 13 मध्ये एकूण 19 हजार 806 लोकसंख्या येते. यामध्ये अनुसूचित जाती 3 हजार 435, तर अनुसूचित जमातींची संख्या 178 आहे.
प्रभाग क्रमांक 13 मध्ये समाविष्ठ होणारा भाग
उत्तरेकडील भाग
सी वॉर्ड शाहू रोड टापटन शोरुम चौक ते व्हिनस कॉर्नर से पूर्व बाजू कंपौंड स्टेशन रोड गोकुळ हॉटेल पूर्व बाजू कंपॉड रेल्वे हद्द पश्चिमेकडे वाहनतळ अग्नेय कोपरा दक्षिण बाजूचा रस्त्याने पाण्याची टाकी से रेल्वे फाटक ते रेल्वे लाईनने साईक्स एक्सर्टेनशन मधील मौनी अपार्टमेंटपर्यंत.
पूर्वेकडील भाग
एस आर डी बबल फॅक्टरी साईक्स एक्सटेंशन मौनी अपार्टमेंट पश्चिम हद्दीने वि स खांडेकर चौक टाकाळा पश्चिमेकडे राजाराम रोडने जनता बाजार चौक (पेटालूम) पासून दक्षिणेकडे राजारामपूरी मेनरोडने ४ थी गल्ली • सिलाई वर्ल्ड कापड दुकानाचे दक्षिण बाजुचे पॅसेजने पश्चिमेकडे नॅचरल आईस्क्रीमपर्यंत तेथुन दक्षिणेस ५ वी गल्ली चौक ते पश्चिमेस रघुनाथ मित्रमंडळ ५ वी गल्ली ते शिवाजी विद्यापीठ रोड पर्यंत (शाहु मिल)
दक्षिणेकडील भाग
रघुनाथ मित्रमंडळ ५ वी गल्ली तेथून पश्चिमेकडे इंडिया स्क्रॅप ट्रेडरच्या बाजूने तेथून शाहूमिल पूर्व बाजू रस्त्याने शाहू मिल चौक ते जयराज पेट्रोलपंप ते पार्वती टॉकीज ते शेळके पुलापर्यंत
पश्चिमेकडील भाग
शेळके ब्रिज ते जयंती नाल्याने उत्तरेकडे रिलायन्स मॉलचे दक्षिण बाजूने सुभाष रोड ते फोर्ड कॉर्नर चौक ते | उत्तरेस सुभाष रोडने टायटन शोरूमपर्यंत