Kolhapur Loksabha Result Live Update : कोल्हापुरात निकालापूर्वीच विजयाचे पोस्टर्स लागले; प्रत्यक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली
कोल्हापूरमध्ये काँग्रेस उमेदवार शाहू महाराज विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक अशी लढत होत आहे. निवडणुकीमध्ये शाहू महाराज उतरल्याने या निवडणुकीची चर्चा राज्यात नव्हे तर देशभरामध्ये पोहोचली आहे.
Kolhapur Loksabha Result Live Update : अवघ्या देशांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या लोकसभा रणधुमाळीचा आज (4 जून) प्रत्यक्ष निकाल लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा फक्त ही राज्यातच नव्हे तर अवघ्या देशभरामध्ये पोहोचली आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेस उमेदवार शाहू महाराज विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक अशी लढत होत आहे. प्रत्यक्ष या निवडणुकीमध्ये शाहू महाराज उतरल्याने या निवडणुकीची चर्चा अवघ्या राज्यात नव्हे तर देशभरामध्ये पोहोचली आहे. दरम्यान, कोल्हापूर लोकसभेसाठी अत्यंत चुरशीने 71 टक्के मतदान झालं होतं. त्यामुळे वाढलेलं एक टक्का मतदान कोणाला धक्का देणार किंवा कोणाच्या विजयासाठी टर्निंग पॉईंट ठरणार? याची सुद्धा चर्चा मतदारांमध्ये रंगली आहे.
कोल्हापूर हाय हे ! 💝✌🏻💥 pic.twitter.com/XKB5pFayhS
— Samadhan Patil (@Samadhan_MH09) June 3, 2024
निकालासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी बाकी असतानाच कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांच्या आपल्या विजयाचे बॅनर लागल्याने एकच चर्चा रंगली आहे. लोकसभा एक्झिट पोलमध्ये शाहू महाराज यांनी आघाडीवर असल्याचे दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे उत्साही कार्यकर्त्यांकडून शिवाजी चौकात बॅनर लावण्यात आलं असलं, तरी अंतिम निकाल काय असेल याची उत्तर मात्र दुपारी बारा वाजेपर्यंतच मिळणार आहे.
#loksabhaelectionresults2024 Pune Lok Sabha Result 2024: मला कोथरुडमध्ये पडणारी मतं पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल, निकालापूर्वी रवींद्र धंगेकरांचं सूचक वक्तव्य, पुण्यात चमत्कार होणार?https://t.co/6OnqhvYzMq#माझाखासदार #ResultsOnABPMajha #ABPResult
— ABP माझा (@abpmajhatv) June 4, 2024
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे होता. मात्र, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी मतदारसंघातील समीकरण लक्षात घेत आपल्या ताब्यात घेतला आहे. या लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा आणण्यात आलं होतं, महायुतीच्या अनेक नेत्यांच्या सुद्धा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सभा झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळ ठोकला होता. त्यामुळे कोल्हापूरकरांनी गुलाल कोणासाठी दिला आहे याचे उत्तर मात्र आता अवघ्या काही तासांमध्ये मिळणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या