Kolhapur Loksabha : कोल्हापूर लोकसभेला दुपार तीनपर्यंत 51.51 टक्के मतदान; कोल्हापूर दक्षिणमध्ये वेग मंदावला
कोल्हापूर दक्षिणमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45.62 टक्के मतदानाची नोंद झाली. कोल्हापूर उत्तरमध्ये 49.54 टक्के मतदानाची नोंद झाली. तुलनेमध्ये चंदगड कागल आणि राधानगरी व मतदार संघामध्ये मतदान वाढलं आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज चुरशीने मतदान सुरू आहे. दुपार तीनपर्यंत कोल्हापूरमध्ये 51.51 टक्के मतदानाची नोंद झाली आहे तर हातकणंगलेमध्ये 49.94 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये असणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी करवीरने आतापर्यंत घेतलेली आघाडी कायम आहे. करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू झाल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानामध्ये घेतलेली आघाडी कायम आहे.
Kolhapur Loksabha : कोल्हापुरात उमेदवारांपासून ते छत्रपती घराण्याने बजावला मतदानाचा हक्कhttps://t.co/vdXK1rEDJT
— ABP माझा (@abpmajhatv) May 7, 2024
तुलनेमध्ये कोल्हापूर दक्षिणमध्ये मात्र मतदानाचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45.62 टक्के मतदानाची नोंद झाली होती, तर कोल्हापूर उत्तर मध्ये 49.54 टक्के मतदानाची नोंद झाली. तुलनेमध्ये चंदगड कागल आणि राधानगरी व मतदार संघामध्ये मतदानाचा वेग दुपार असूनही वाढल्याचे दिसून येत आहे. चंदगडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 51.45 टक्के मतदानाची नोंद झाली. कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये 54.70 टक्के मतदानाची नोंद झाली, तर राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये 51.81 टक्के मतदानाची नोंद झाली.
हातकणंगले लोकसभेतील उमेदवार धैर्यशील माने-सत्यजित पाटलांच्या कार्यकर्त्यांची जोरदार हाणामारी #Kolhapur #Maharashtra https://t.co/Pdu2TMrGw4
— ABP माझा (@abpmajhatv) May 7, 2024
सतेज पाटलाकंडून कार्यकर्त्यांना आवाहन
दरम्यान, कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा वेग मंदावल्याचे लक्षात आल्यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी व्हॉइस मेसेजच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना अजून मतदान होण्याचे गरजेचं असून राहिलेल्या तासांमध्ये ताबडतोब मतदानाला कसे येतील ते पाहावे, असे आवाहन केलं आहे.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 42.63 टक्के मतदान
- लातूर - 44.88 टक्के
- सांगली - 41.30 टक्के
- बारामती - 34.96 टक्के
- हातकणंगले - 49.94 टक्के
- कोल्हापूर - 51.51 टक्के
- माढा - 39.11टक्के
- उस्मानाबाद - 40.92 टक्के
- रायगड - 41.43 टक्के
- रत्नागिरी –सिंधुदूर्ग - 44.73 टक्के
- सातारा - 43.83 टक्के
- सोलापूर - 39.54 टक्के
इतर महत्वाच्या बातम्या