एक्स्प्लोर

Kolhapur : कोल्हापुरात खासबाग मैदानाची भिंत कोसळली, एका महिलेचा ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू 

Kolhapur Rain : अतिपावसामुळे ऐतिहासिक अशा खासबाग मैदानाची संरक्षण भिंत कोसळली आणि त्याखाली दोन महिला सापडल्या. त्यापैकी एकीचा मृत्यू झाला.

Kolhapur Rain : कोल्हापुरातील खासबाग मैदानाची संरक्षण भिंत कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. नाटक पाहायला आलेल्या या दोन महिला या ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. नंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आलं. पण त्यापैकी एकीचा मृत्यू झाला. अश्विनी यादव असे मृत महिलेचे नाव असून संध्या तेली ही महिला जखमी आहे.
 
कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक कुस्तीचे मैदान असलेल्या खासबाग मैदानाची संरक्षण भिंत कोसळून दोन महिला ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना आज संध्याकाळी घडली होती. कोल्हापूर महानगरपालिके अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन महिलांना बाहेर काढण्यात आले. या घटनेत दुर्दैवानं एका महिलेचा मृत्यू झाला आहे..

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात पावसाचा जोर आहे. मंगळवारी अतिपावसामुळे संध्याकाळच्या सुमारास खासबाग मैदानाच्या पूर्वेकडील भली मोठी भिंत कोसळली. 20 फूट उंच आणि आणि 50 फूट लांब असलेली ही प्रेक्षक गॅलरीची भिंत कोसळली. त्याच वेळी या दोन महिला लघुशंकेसाठी भिंतीच्या कडेला गेल्या होत्या. भिंत पडल्यानंतर  दोघीही त्या ढिगार्‍याखाली अडकल्या. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने दोघींनाही बाहेर काढले. मात्र त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी आहे. जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत. 

उद्यापासून 28 गावांतील शाळा बंद 

कोल्हापुरातील संभाव्य पुराच्या पहिल्या टप्प्यात येणाऱ्या 28 गावांतील शाळा बुधवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी ही माहिती दिली. संबंधित गावातील शाळेत निवारा केंद्र उभारली जाणार आहेत. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 

पंचगंगेची पाणी पातळी स्थिर 

पंचगंगा नदीची पाणी पातळी सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून स्थिर आहे. सध्या पंचगंगा ही 40 फूट 4 इंचावरून वाहत आहे. सोमवारी सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र दिसतंय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना तसेच कोल्हापूर शहरातील सकल भागातील रहिवाशांना हा दिलासा म्हणावा लागेल. ज्या पद्धतीने हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला होता, त्यापेक्षा खूप कमी पाऊस जिल्ह्यामध्ये झाला. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर झाली आहे. मात्र जिल्ह्यातील 83 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. शिवाय राधानगरी धरणामध्ये देखील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसात राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले होऊ शकतात.

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीबाबत कोणत्याही अफवेवर कोल्हापूरच्या नागरिकांनी विश्वास ठेवू नये, तसंच नागरिकांनी गोंधळून न जाता सतर्क राहणं गरजेचं असल्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

ही बातमी वाचा: 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Yash Birla Majha Maha Katta : शाळेत वडील मर्सिडीजमध्ये सोडायचे, पण मी गाडी शाळेच्या बाहेर थांबवायचो
Yash Birla Majha Maha Katta : विमानातून प्रवास करताना सुट-बूट का घालायचं? -यश बिर्ला
Anup Jalota Majha Katta : अनुप जलोटा-पंकज उदास यांची गाण्यातून सेवा, कॅन्सर पेशंटला मदत
Anup Jalota Majha Maha Katta : 5 वर्ष थांबायला हवं होतं..अनुप जलोटांनी खंत बोलून दाखवली
Anup Jalota Majha Maha Katta : बिग बॉसमध्ये प्रतिमा मलिन झाली? अनुप जलोटा स्पष्ट बोलले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
SMAT : अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर रोमांचक विजय
अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर विजय
Ramraje Naik Nimbalkar :  प्रोटोकॉल बाजूला ठेवून आलो,  मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
Imran Khan: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Video: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Embed widget