Kolhapur Ganesh 2022 : कोल्हापूर शहरातील पर्यावरणपूरक गणेशोत्सव मंडळांसाठी पुरस्कार
Kolhapur Ganesh 2022 : राज्य सरकारने राबवलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेच्या धर्तीवर कोल्हापूर शहरातील मंडळांसाठी गणेशोत्सव मंडळ स्पर्धा कोल्हापूर महानगरपालिकेकडून घेण्यात येणार आहे.
Kolhapur Ganesh 2022 : राज्य सरकारने राबवलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेच्या धर्तीवर कोल्हापूर शहरातील मंडळांसाठी गणेशोत्सव मंडळ स्पर्धा कोल्हापूर महानगरपालिकेकडून घेण्यात येणार आहे. शहरातील मंडळ शासन स्तरावर व महापालिका दोन्ही ठिकाणी नोंदणी करून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. दरम्यान, राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे स्पर्धेचे स्वरूप व निकष ठरवण्यात आले आहेत.
कोणत्या मंडळाला सहभागी होता येईल?
स्थानिक पोलीस ठाणे आणि मनपाची परवानगी घेतलेल्या मंडळांना सहभागी घेता येईल. या स्पर्धेतील सहभाग मोफत आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी www.kolhapurcorporation.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तो अर्ज भरून healthswm1@gmail.com या मेलवर शनिवारी 3 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पाठवता येईल.
अथवा महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील मुख्य आरोग्य निरीक्षक कार्यालयात जमा करता येईल. या स्पर्धेमधून तीन स्पर्धकांची विजेते म्हणून निवड होणार आहे. मुल्यांकन करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. प्रशस्तीपत्र आणि चषक असे पुरस्काराचे स्वरुप आहे. निकालाची तारीख व बक्षीस वितरण समारंभ नंतर मनपा प्रशासनाकडून कळवण्यात येणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या