Kolhapur District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीत भाजपचे वर्चस्व; चार तालुक्यांना स्थानही नाही
Kolhapur District Planning Committee : कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीवर पूर्णपणे भाजपचे वर्चस्व राहिले असून यामध्ये चार तालुक्यांना स्थानही देण्यात आलेलं नाही. त्यामुळे राजकीय भूवया उंचावल्या आहेत.
Kolhapur District Planning Committee : कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीवर पूर्णपणे भाजपचे वर्चस्व राहिले असून यामध्ये चार तालुक्यांना स्थानही देण्यात आलेलं नाही. त्यामुळे राजकीय भूवया उंचावल्या आहेत. खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे यांच्यासह भाजपचे माजी आमदार अमल महाडिक, भाजपचे जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी नगरसेवक सत्यजित कदम आदींची जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागली आहे.
जिल्हा नियोजन समितीचा अनुभव असलेल्या 14 सदस्यांसह एकूण 19 सदस्यांची नावे राज्य सरकारने जाहीर केली आहेत. दरम्यान नवीन सदस्यांना शनिवारी होणाऱ्या जिल्हा नियोजनच्या पहिल्या बैठकीला उपस्थित राहता येईल. समिती सदस्यांमध्ये करवीर, शाहूवाडी, गगनबावडा, चंदगड तालुक्यातील एकाही प्रतिनिधींचा समावेश नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व समित्या रद्द करण्यात आल्या होत्या. दरम्यान, उद्या होत असलेल्या नियोजन समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी नावे जाहीर करण्यात आली. जिल्हा नियोजनासंबंधी ज्ञान असलेल्या चार सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत.
नामनिर्देशित सदस्यांमध्ये यांचा समावेश
नामनिर्देशित सदस्यांमध्ये खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, प्रतापराव देशमुख (रा. नरंदे, ता. हातकणंगले), यशवंत नांदेकर (रा. तिरवडे, ता. भुदरगड) आणि प्रसाद खोबरे (रा. तारदाळ, ता. हातकणंगले) यांचा समावेश आहे.
विशेष निमंत्रित
भरमू पाटील (रा. बसर्गे, ता. चंदगड), समरजितसिंह घाटगे (रा. नागाळा पार्क, ता. कोल्हापूर), माजी आमदार अमल महाडिक (शिरोली, ता. हातकणंगले), सत्यजित कदम (रुईकर कॉलनी, कोल्हापूर), राहुल देसाई (रा. गारगोटी, ता. भुदरगड), अमित कामत (रा. मोरेवाडी, कोल्हापूर), अशोकराव माने (रा. शिरोळ), सत्यजित पाटील, (रा. सोनाळी, ता. कागल), शिवाजी चौगुले (पंडेवाडी, ता. राधानगरी), चंद्रकांत मोरे (रा. शिरढोण, ता. शिरोळ), दशरथ काळे (अब्दुललाट, ता. शिरोळ), संजय पोवार (राजारामपुरी, कोल्हापूर), अंकुश निपाणीकर (राजारामपुरी, कोल्हापूर) व अभयकुमार मगदूम (रा. माणगाव, ता. हातकणंगले).
जिल्हा नियोयन समितीची शनिवारी पालकमंत्री दीपक केसरकरांच्या अध्यक्षतेखाली बैठक
कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची सभा उद्या शनिवारी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या बैठकीत 10 जानेवारी 2022 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तास व इतिवृत्त कार्यपूर्ती अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना मार्च 2022 अखेरच्या खर्चास मान्यता देणे, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2021-22 कोविड-19 च्या प्रादुर्भावावरील उपाय योजना करण्यासाठी मान्यता दिलेल्या कामांना व पुनर्विनियोजनास कार्योत्तर मंजुरी देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 माहे नोव्हेंबर 2022 अखेरील खर्चाचा आढावा घेणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 मधील पुनर्विनियोजनास मंजुरी देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 च्या प्रारुप आराखड्यास मंजुरी देणे व आयत्यावेळचे विषय, असे विषय होणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या