Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील गावगाड्यावर आज गुलालाची उधळण; साडे आठलाच पहिला निकाल येणार
Kolhapur District Gram Panchayat Election : महिनाभरापासून सुरु असलेल्या गावगाड्यावर आज गुलालाची उधळण होणार आहे. जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सकाळी आठपासून सुरु होईल.
Kolhapur District Gram Panchayat Election : गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या गावगाड्यावर आज गुलालाची उधळण होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सकाळी आठपासून सुरु होईल. सकाळी साडेआठच्या सुमारासच पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मतमोजणीस्थळी कडक बंदोबस्त आहे. सीसीटीव्हीचीही नजर असणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्या-त्या तालुक्याचे तहसीलदार काम पाहतील. त्यांना एक सहायक अधिकारही असणार आहे.
थेट जनतेतून सरपंच निवड असल्याने पक्षाचा किंवा आघाडीचा सरपंच होणार यावरही आगामी गणिते मांडली जाणार आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर ग्रामपंचायतींमध्ये काय परिणाम होणार याचीही उत्सुकता आहे.
दरम्यान, प्रत्येक गटाला, पॅनेलला विजयाचा विश्वास आहे. दुसरीकडे पोलिसांनी विजयी मिरवणुकीला परवानगी नाकरली आहे. मतमोजणी केंद्रात उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधींना ओळखपत्र दिली गेली आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी चुरशीने 84.08 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात 4 लाख 12 हजार 182 महिलांनी, 4 लाख 48 हजार 763 पुरुषांनी तर 9 इतर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
या ठिकाणी होणार मतमोजणी
- गगनबावडा : तहसील कार्यालय
- राधागनरी : शासकीय गोदाम
- भुदरगड - गारगोटी मौनीनगर तालुका क्रीडा संकुल
- आजरा : तहसील कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
- हातकणंगले : तहसील कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत
- शिरोळ : तहसील कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
- शाहूवाडी : तहसील कार्यालयातील जुने शासकीय धान्य गोदाम
- पन्हाळा : नगरपालिका सभागृह
- करवीर : बहुउद्देशीय हॉल रमण मळा कसबा बावडा
- कागल : जवाहर नवोदय विद्यालय
- गडहिंग्लज : नगरपरिषद पॅव्हिलियन हॉल
- चंदगड : तहसील कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
करवीर तालुक्यातील निकालाची उत्सुकता
दरम्यान, करवीर (Kolhapur District Gram Panchayat Election) तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींसाठी मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. अतिसंवेदनशील गावांमध्ये पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, किरकोळ वादाचे प्रसंग काही ठिकाणी घडले. करवीर तालुक्यात 282 मतदान केंद्रांवर 78 हजार 433 महिला, तर 86 हजार 270 पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. इतर 8 जणांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात 1 लाख 64 हजार 711 जणांनी मतदान केले. एकूण 82.33 टक्के मतदानाची नोंद झाली.
इतर महत्वाच्या बातम्या