एक्स्प्लोर

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा इशारा आणि कोल्हापुरात अलर्ट, 24 डिसेंबर ते 7 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश

Kolhapur Curfew : मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम रविवारी संपणार असून त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पंधरा दिवसांचा कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. 

कोल्हापूर: मराठा आरक्षणच्या (Maratha Reservation) विषयावर मनोज जरांगे (Manoj Jarang) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी बीडमध्ये भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य सरकारने जर 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण मिळालं नाही तर पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर प्रशासनाने जिल्ह्यात 24 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान जमावबंदीचे आदेश (Kolhapur Curfew)  जारी केले आहेत. 

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात जमावबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. कलम 37 अ नुसार अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात जमाव बंदीचे आदेश दिले आहेत. मराठा समाजाने आरक्षणाबाबत दिलेली मुदत संपत आल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. 

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर सरकारने शिंदे समिती स्थापन केली. शिंदे समितीने केलेल्या शिफारशीनंतर राज्यभरात 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या. आता त्याच अहवालाच्या आधारे येत्या फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्यात येणार असून त्यामध्ये मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय घेणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. पण राज्य सरकारची ही भूमिका मान्य नसून 24 डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षण द्यावं आणि तेही सरसटक द्यावं अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. 

सरसकट आरक्षणावर ठाम, सरकारकडे आता उद्याचा दिवस

मराठा आरक्षणाची 24 डिसेंबरनंतरची पुढील दिशा काय असणार यासाठी आज बीडमध्ये मनोज जरांगे यांची सभा होत आहे. या सभेपूर्वी मनोज जरांगे यांनी बीड शहरात पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. सरसकट आरक्षणावर आम्ही ठाम असून, सरकारकडे आज आणि उद्याचा दिवस आहे. बाकी सर्व माहिती आजच्या सभेत सांगणार असल्याचं जरांगे म्हणाले आहे. 

यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "किती दिवस आम्हाला आरक्षणासाठी झुलवत ठेवणार. आजच्या सभेत सर्वकाही सांगणार आहे. संयम किती दिवस पाळायचा आम्हालाही मर्यादा आहे. सरकारच्या हातात आजचा आणि उद्याचा दिवस आहे. सरकारने लिहिलेले शब्द सरकार पाळत नाही. आजच्या सभेतून मराठा समाजासमोर सर्व सत्य मांडणार आहे. मराठा समाजाने आणखी किती दिवस अन्याय सहन करायचा. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी आमची आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही आरक्षण मागत आहोत."

ही बातमी वाचा: 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

व्हिडीओ

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार

Embed widget