एक्स्प्लोर

Kolhapur News: वडणगेत दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू; कागल तालुक्यातही तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Kolhapur Crime: दोघांनी मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच त्यांना रिॲक्शन आल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज त्यांच्या मुलींनी व्यक्त केला आहे.

Kolhapur Crime: कोल्हापूर शहरातील (Kolhapur News) शिवाजी पेठेतील दाम्पत्याचा वडणगेत (ता. करवीर) संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. (ता. करवीर) मधुकर दिनकर कदम (वय 59) आणि जयश्री मधुकर कदम (49, दोघे रा. दिंडे कॉलनी, वडणगे) यांचा बुधवारी संशयास्पद मृत्यू झाला. दोघांनी मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच रिॲक्शन आल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज त्यांच्या मुलींनी व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी दोघांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. मृत दाम्पत्याच्या पश्चात गायत्री (वय 19) आणि विजया (17) दोन मुली आहेत.  

एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेले कदम यांना मधुमेहाचा त्रास सुरू होता. पत्नी जयश्री यांनाही काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास सुरू होता. मधुकर कदम मुळचे कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठेतील आहेत. पत्नी आणि दोन मुलींसह एक वर्षभरापूर्वी ते वडणगेमधील त्यांच्या नवीन घरी वास्तव्यास गेले होते. 

15 दिवसांपूर्वी आयुर्वेदिक औषध घेतले

कदम यांनी मधुमेहाचा त्रास असल्याने कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहतमधील डॉक्टरकडून 15 दिवसांपूर्वी आयुर्वेदिक औषध घेतले होते. बुधवारी सकाळी पावडरचे औषध घेतल्यानंतर मधुकर कदम हे दूध आणण्यासाठी बाहेर गेले. पत्नी जयश्री घरी स्वयंपाक करत होत्या. औषध घेतल्यानंतर काही वेळातच जयश्री यांना श्वासोच्छवासास त्रास होऊ लागला आणि बेशुद्ध पडल्या. दूध आणण्यासाठी गेलेल मधुकर कदमही दूध डेअरीजवळच्या चौकात चक्कार येऊन पडले. ग्रामस्थानी त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी परिस्थिती पाहून सीपीआरमध्ये पाठवले. सीपीआरमधील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांचाही मृत्यू झाला होता. 

कागल तालुक्यात तरुणाचा मृतदेह आढळला

दरम्यान, कागल निढोरी राज्य मार्गावर बामणी (ता. कागल) हद्दीतील शेतामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणाच्या शरीरावर मारहाणीच्या खुना आहेत. दरम्यान मृत तरुणाची ओळख पटली असून त्याचे नाव अमरसिंह दत्तात्रय थोरात (वय 30) असे आहे. तो वाळवा तालुक्यातील गोटखिंडे या गावचा असल्याचे समजते. कोल्हापुरातील लाॅ कॉलेजमध्ये द्वितीय वर्ष शिकत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या तरुणाच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेली नाही. सदर घटनेची नोंद कागल पोलिसात झाली असून ते अधिक तपास करत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
Buldhana Bald Virus : बुलढाण्यातील केस गळती, टक्कल प्रकरण; आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेच, आता ICMR चेन्नई, दिल्लीचं पथक पाहाणी करणार
बुलढाणा केस गळती, टक्कल प्रकरण; आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेच, आता ICMR चेन्नई, दिल्लीचं पथक पाहाणी करणार
किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली
किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane on Vaibhav Naik:सिंधुदुर्ग विमानतळाला टाळं मारलं तर तुझ्या घराला टाळं मारेन- नारायण राणेABP Majha Marathi News Headlines 8AM Headlines 08AM 13 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सNashik Dwarka Bridge Accident : द्वारका ब्रिजवर भीषण अपघात; तरुणांचा अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरलSantosh Deshmukh Death Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाचा स्वत:ला संपवण्याचा इशारा, ग्रामस्थही आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
Buldhana Bald Virus : बुलढाण्यातील केस गळती, टक्कल प्रकरण; आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेच, आता ICMR चेन्नई, दिल्लीचं पथक पाहाणी करणार
बुलढाणा केस गळती, टक्कल प्रकरण; आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेच, आता ICMR चेन्नई, दिल्लीचं पथक पाहाणी करणार
किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली
किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
Nashik Accident: टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात घुसल्या, नाशिकच्या द्वारका पुलावर अपघात नेमका कसा घडला?
टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात घुसल्या, नाशिकमधील अपघाताचं खरं कारण समोर
Hrithik Roshan Luxury House : सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
Torres Scam : दादरचं ऑफिस 25 लाखात मिळवून दिलं, कंपनीनं दहावी नापासला तौसिफला CEO केलं, टोरेसचे धक्कादायक कारनामे
टोरेस घोटाळ्यात पोलिसांची मोठी कारवाई, 14 महागड्या कार जप्त; कंपनीच्या सीईओबद्दल धक्कादायक माहिती
Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?
सुकेश चंद्रशेखर तुरुंगात पण विदेशात कमाई? 7640 कोटींचा कर द्यायचाय, अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं?
Embed widget