Kolhapur Crime : पक्षकाराच्या मालमत्तेत हिस्सा मागितला; वकिलाची पाच वर्षांसाठी सनद रद्द, जिल्ह्यात पहिलीच कारवाई झाल्याने खळबळ
खटला लढवण्यासाठी दोन कोटी रुपये फी देण्याचे ठरले होते होते. यातील 11 लाख रुपये ॲड. घाटगे यांना पोहोचले होते. उर्वरित रकमेसाठी मालमत्तेतील 33 टक्के हिस्सा देण्याचे वकिलांनी महिलेकडून लिहून घेतले.
कोल्हापूर : पक्षकाराच्या मालमत्तेत हिस्सा मागितल्याने वकिलाला तगडा झटका देण्यात आला आहे. पक्षकार महिलेकडे खटला चालवण्यासाठी 11 लाख रुपयांचे शुल्क घेऊन, उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी मालमत्तेतील 33 टक्के हिस्सा देण्याचे लिहून घेतल्याबद्दल ॲड. रणजीतसिंह सुरेशराव घाटगे (रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांची सनद ( Lawyer Charter) पाच पर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या शिस्तपालन समितीने ही कारवाई केली. असा प्रकारची कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) ही पहिलीच कारवाई असल्याने खळबळ उडाली आहे. व्याजासहित 14 लाख रुपये तक्रारदार महिलेस परत देण्याचा निर्णय दिला. दंडाची रक्कम अदा न केल्यास तहहयात सनद रद्द होणार आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली.
33 टक्के हिस्सा देण्याचे वकिलांनी महिलेकडून लिहून घेतले
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार इचलकरंजीमधील पक्षकार महिलेच्या पतीचे निधन झालं आहे. यानंतर सासरच्या मंडळींनी तिचा मालमत्तेमधील अधिकार नाकारला. त्यानंतर संबंधित महिलेने ॲड. घाटगे यांच्या माध्यमातून न्यायालयात दावा दाखल केला. खटला लढवण्यासाठी दोन कोटी रुपये फी देण्याचे ठरले होते होते. यातील 11 लाख रुपये ॲड. घाटगे यांना पोहोचले होते. उर्वरित रकमेसाठी मालमत्तेतील 33 टक्के हिस्सा देण्याचे वकिलांनी महिलेकडून लिहून घेतले.
महिलेची बार कौन्सिलकडे तक्रार
दरम्यान, फी घेऊन आणि वाटा लिहून घेऊनही योग्य पद्धतीने खटला लढवला नाही. त्यामुळे पक्षकार महिलेने बार कौन्सिलकडे तक्रार दाखल केली होती. कौन्सिलचे शिस्तपालन समितीचे सदस्य ॲड. आशिष देशमुख यांनी चौकशी करून ॲड. घाटगे यांना सकृतदर्शनी दोषी ठरवले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ही तक्रार तीन सदस्यीय समितीकडे वर्ग केली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेऊन समितीने ॲड. घाटगे यांची सनद पाच वर्षांसाठी रद्द करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या