एक्स्प्लोर

Kolhapur Crime: संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण; माजी नगरसेविका शुभदा पाटील, एपीआय राऊतच्या पोलिस कोठडीत वाढ

संतोष शिंदे यांनी सुसाईड नोटमध्ये एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शुभदा पाटील आणि राहुल राऊतने खोट्या गुन्ह्यात अडकवून त्रास दिल्याचा उल्लेख केला होता. शिंदे यांच्या आत्महत्येनंतर दोघे फरार होते.

Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधील उद्योजक संतोष शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि निलंबित एपीआय राहुल राऊत या दोघांच्या पोलिस कोठडीत आज एक दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. त्यांना पुन्हा उद्या शनिवारी (1 जुलै) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

संतोष शिंदे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये या दोघांनी एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शुभदा पाटील आणि राहुल राऊतने खोट्या गुन्ह्यात अडकवून त्रास दिल्याचा उल्लेख केला होता. शिंदे यांच्या आत्महत्येनंतर शुभदा पाटील व राहुल फरार झाले होते. त्यांना सोलापुरातून कोल्हापूर पोलिसांच्या टीमने उचलले होते. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी आज संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुजित राठोड यांच्यासमोर त्यांना उभे करण्यात आले. यावेळी न्यायालय परिसरात मोठी गर्दी जमली होती. सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या पुण्यातील दोघेजण अजूनही फरारी आहेत.

23 जून रोजी उद्योजक संतोष शिंदे, पत्नी तेजस्विनी व मुलगा अर्जून यांनी राहत्या घरातील बेडरूममध्ये विष प्राशन करून व गळ्यावर सुरी ओढून आत्महत्या केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आला होता. 

विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. शिवाजी राणे यांना नियुक्त करा 

दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी, यासाठी राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. शिवाजी राणे यांना नियुक्त करावे, अशी मागणी आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केली आहे. शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षकांना निवेदन देत  राणे यांना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्याची मागणी केली. राणे यांना फिर्यादीची बाजू मांडण्यासाठी वकीलपत्र घालण्याची लेखी विनंती करण्यात आली. राणे यांनी विनंती मान्य केली आहे. विशेष वकील म्हणून नियुक्तीबाबत सरकारकडे प्रस्ताव देण्यात येणार आहे. त्यासाठी संमतीपत्रही अ‍ॅड. राणे यांनी दिले आहे. 

एपीआय राऊत निलंबित 

दुसरीकडे, उद्योजक संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एपीआय राहुल राऊतला निलंबित करण्यात आले आहे. त्याला निलंबित केल्याची माहिती अमरावतीचे पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे. गडहिंग्लजमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासात त्याने कोणत्याही प्रकारची हालचाल करु नये, पोलिस तपासात दबाव आणू नये यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत ही निलंबनाची कारवाई असणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
Pravin Datke : लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
विधानपरिषदेत टशन... नाथाभाऊ म्हणाले उपकार नाही, तो माझा अधिकार; निलमताई म्हणाल्या दरडवायचं नाही
विधानपरिषदेत टशन... नाथाभाऊ म्हणाले उपकार नाही, तो माझा अधिकार; निलमताई म्हणाल्या दरडवायचं नाही
Wisconsin School Shooting : अवघ्या 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीनं शाळेत घुसून शिक्षिका आणि विद्यार्थिनीला हँडगनने गोळ्या घालून ठार केलं
अवघ्या 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीनं शाळेत घुसून शिक्षिका आणि विद्यार्थिनीला हँडगनने गोळ्या घालून ठार केलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushama Andhare PC | जय श्रीरामच्या घोषणा, सुषमा अंधारेंना नागपूर विमानतळावर जिवे मारण्याची धमकीMumbai Andheri Accident : रस्ता ओलांडताना बाईकने उडवलं, तरुण डिव्हायडरवर पडला|CCTVNarhari Zirwal on Chhagan Bhujbal : भुजबळांचा पुढे मोठा विचार होणार, नरहरी झिरवळांचं सूचक वक्तव्यTop 100 : 100 headlines 17 December 2024 एबीपी माझा लाईव्ह ABP LIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
Pravin Datke : लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
विधानपरिषदेत टशन... नाथाभाऊ म्हणाले उपकार नाही, तो माझा अधिकार; निलमताई म्हणाल्या दरडवायचं नाही
विधानपरिषदेत टशन... नाथाभाऊ म्हणाले उपकार नाही, तो माझा अधिकार; निलमताई म्हणाल्या दरडवायचं नाही
Wisconsin School Shooting : अवघ्या 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीनं शाळेत घुसून शिक्षिका आणि विद्यार्थिनीला हँडगनने गोळ्या घालून ठार केलं
अवघ्या 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीनं शाळेत घुसून शिक्षिका आणि विद्यार्थिनीला हँडगनने गोळ्या घालून ठार केलं
उद्धव ठाकरे-फडणवीसांची भेट, नाना पटोलेंकडे मात्र दुर्लक्ष? विधिमंडळ परिसरात आज काय-काय घडलं?
उद्धव ठाकरे-फडणवीसांची भेट, नाना पटोलेंकडे मात्र दुर्लक्ष? विधिमंडळ परिसरात आज काय-काय घडलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2024 | मंगळवार
फुलांपासून आयफेल टॉवर! फुलं, धान्यांपासून साकारल्या विविध प्रतिकृती
फुलांपासून आयफेल टॉवर! फुलं, धान्यांपासून साकारल्या विविध प्रतिकृती
Australia vs India, 3rd Test : बुमराह-आकाश दीपने राहुल द्रविड-लक्ष्मणच्या 'त्या' यादगार खेळीची तब्बल 23 वर्षांनी आठवण करून दिली!
बुमराह-आकाश दीपने राहुल द्रविड-लक्ष्मणच्या 'त्या' यादगार खेळीची तब्बल 23 वर्षांनी आठवण करून दिली!
Embed widget