एक्स्प्लोर

Kolhapur Crime : घरालाच बनवला वेश्या अड्डा, वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या पतीला अटक; पीडित पत्नीची सुटका

Kolhapur Crime : अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बालिंगा (ता. करवीर) येथे छापेमारी करत वेश्या अड्ड्यावर कारवाई करत पीडीत महिलेची सुटका केली. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

Kolhapur Crime : पत्नीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन पतीने घरातच वेश्या अड्डा सुरु केल्याची घटना कोल्हापुरात (Kolhapur) घडली. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बालिंगा (ता. करवीर) येथे छापेमारी करत वेश्या अड्ड्यावर कारवाई करत पीडित महिलेची सुटका केली. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा आमले बरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार बालिंगा परिसरात एका घरातच वेश्या अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. छापा टाकला असता पतीकडूनच पत्नीच्या असहाय्यतेचा गैरफायदा उठवत वेशा अड्डा चालवल्याचे समोर आले. पीडित महिला आणि तिचा पती दोघे मूळचे कर्नाटक राज्यातील आहेत. 

दरम्यान, पोलिसांनी घर भाड्याने घेऊन गुन्हे करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे घरमालकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बडकवडे यांनी केलं आहे. भाडेकरु ठेवताना ओळखपत्र, मोबाईल नंबर घ्यावे, त्यांच्या नातेवाईकांची माहिती घ्यावी, भाडे करार करावा, शेजाऱ्यांना भाडेकरुंची कल्पना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. 

दोन महिन्यात दुसऱ्यांदा कारवाई 

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच कोल्हापुरात वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे अन्वेषण व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा टाकून दोघा तरुणांना अटक केली होती. एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली होती. करवीर तालुक्यातील कंदलगाव येथे हा प्रकार घडला. भारती विद्यापीठ रोडवर कंदलगाव हद्दीत एका रेस्टॉरंटमध्ये काही काळापासून वेश्या व्यवसाय सुरु असल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. गरीब, गरजू महिलांना लॉजिंगवर बोलावून तेथे त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. 

अल्पवयीन मुलीवर वर्षभर अत्याचार करुन सात लाखांची खंडणी उकळली

दुसरीकडे, जबरदस्तीने वेश्‍या व्यवसायास जुंपलेल्या बांगलादेशी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी सांगलीमधील विश्रामबाग पोलीस ठाण्यातील कर्मचारी स्वप्नील विश्वास कोळी (वय 39, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) या संशयितास अटक करण्यात आली होती. त्याला निलंबित करण्यात आलं आहे. स्वप्नील कोळी कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यातच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदीसह सात लाखांच्या खंडणीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सतरा वर्षीय पीडितेची फिर्याद घेतली. त्यामध्ये म्हटले आहे की, मूळची बांगलादेशी असलेली ही मुलगी जानेवारी 2022 पासून सांगलीत स्वरुप चित्रमंदिराजवळील वस्तीत या मुलीला एका महिलेने व्यवसायासाठी आणले होते. हवालदार कोळीने पीडितेवर गेल्या वर्षभरापासून अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election : सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले शिट्टी वाजवा त्यांचा तमाशा संपवा
सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले शिट्टी वाजवा त्यांचा तमाशा संपवा
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
Embed widget