(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Crime : आई, भाऊ अन् मामाने तरुणीला मरेपर्यंत मारले, खुनाचा गुन्हा दाखल; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
उच्चशिक्षित असलेल्या वैष्णवी लक्ष्मीकांत पवार (वय 24 रा. केदारलिंग प्लाझा, शनिवार पेठ, कोल्हापूर) असे मृत तरुणीचे नाव असून या तरुणीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. ती एका बँकेमध्ये नोकरीला होती.
कोल्हापूर : मुलगीचा चार महिन्यांपूर्वी साखरपुडा केल्यानंतर लग्नास नकार देऊन मित्रासोबत 'लिव्ह इन'मध्येच राहणार असल्याचा निर्णय घेतल्याने संतापलेल्या आई, भाऊ आणि मामाने बेदम मारहाण केल्याने मृत्यू झाल्याची भयंकर घटना कोल्हापूरमध्ये घडली. यानंतर पोलिसांनी तरुणीची आई, भाऊ आणि मामा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर कोल्हापूरमध्ये एकच थरकाप उडाला. कोल्हापुरात गेल्या 24 तासांमध्ये दोन खुनाच्या घटना आणि तरुणीच्या मृत्यूच्या घटनेनं खळबळ उडाली आहे.
लिव्ह इनचा पर्याय कुटुंबीयांना न आवडल्याने अमानुष मारहाण
उच्चशिक्षित असलेल्या वैष्णवी लक्ष्मीकांत पवार (वय 24 रा. केदारलिंग प्लाझा, शनिवार पेठ, कोल्हापूर) असे मृत तरुणीचे नाव असून या तरुणीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. ती एका बँकेमध्ये नोकरीला होती. तिच्या मनमिळावू स्वभावामुळे तिच्या मित्रांमध्ये चांगलीच परिचित होती.वैष्णवी कोल्हापूर शहरामधील एका ढोल ताशा पथकाची सदस्य सुद्धा असल्याने तिचा मित्रपरिवार मोठा होता. मात्र तिचा लिव्ह इनचा पर्याय कुटुंबीयांना न आवडल्याने बेदम मारहाणीत तिचा मृत्यू झाला.
रात्रभर वेदनांनी तळमळत राहिली
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पन्हाळा तालुक्यातील देवठाणेमध्ये वैष्णवीला घेऊन जात रात्रभर काठी, गज आणि दोरीने बेदम मारहाण आई शुभांगी पवार, भाऊ श्रीधर पवार आणि मामा संतोष आडसूळ या तिघांनी बेदम मारहाण केली. लांडकी दांडके, गज आणि दोरीने तिला मारहाण केली. देवठाणेत अमानुष मारहाण झाल्याने वैष्णवीच्या शरीरावर अनेक ठिकाणी रक्त साखळून रात्रभर तळमळत होती. तिच्या हात, पायावर गंभीर दुखापत झाली होती. गंभीर अवस्थेमध्ये वैष्षवीला गुरुवारी रुग्णालयात आणले होते. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
पोलिसांकडून आई शुभांगी, लहान भाऊ श्रीधर आणि मामा संतोष या तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पवार कुटुंबियांचा कोल्हापुरात चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे. शुभांगी पवारचे पती लक्ष्मीकांत पवार यांच्या मृत्यूनंतर त्या व्यवसाय पाहत होत्या. मुलगा श्रीधर हा मदत करत होता. वैष्णवी एका बँकेमध्ये नोकरीला होती. मात्र ती काही दिवसांपूर्वी नोकरी सोडून पुण्यामध्ये एका मित्रासोबत राहत असल्याची आईला माहिती मिळाली. त्यामुळे विचारणा केल्यानंतर मित्रासोबत लिव्ह इनमध्ये राहणार असल्याची माहिती आईला दिली. मात्र, आईला मुलीचा विचार पटत नसल्याने त्यांच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता.
दरम्यान, दोघांना वेगळे करण्यासाठी वैष्णवीला घेऊन आई, भाऊ पुण्याला बुधवारी गेले होते. मात्र पुन्हा पुन्हा वादावादी झाल्याने कोल्हापूरला परत आले. यानंतर पन्हाळा तालुक्यातील देवठाणेत नेऊन बेदम मारहाण केली. रक्त साखळल्याने ती रात्रभर विव्हळत होती. सकाळी पोटात दुखू लागल्याने वैष्णवी बेशुद्ध झाली. तिला दसरा चौकात खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या