Kolhapur : दारू पिऊन पत्नी-मुलांना त्रास देतोय, सख्ख्या भावानेच 6 लाखांची सुपारी दिली, खिंडीत गाठून डोक्यात दगड घातला
Kolhapur Murder : खून करण्यापूर्वी तीन लाख आणि खून झाल्यानंतर तीन लाख असा व्यवहार ठरला होता. त्यानुसार आरोपींनी अविनाश पाटीलवर पाळत ठेवली आणि त्याचा काटा काढला.

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील तमदलगे येथील बसवान खिंड येथे निर्जन डोंगरामध्ये घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. सख्ख्या भावानेच सहा लाखांची सुपारी देऊन भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अविनाश उर्फ दिपक ओमगोंडा पाटील असं मयताचं नाव असून जिनगोंडा ओमगोंडा पाटील असं आरोपी भावाचं नाव आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जयसिंगपूर पोलिसांच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आला आहे.
बसवान खिंडीत असले डोंगरात तमदलगे गावच्या हद्दीत 27 मे रोजी अविनाश उर्फ दिपक ओमगोंडा पाटील याचा खून झाला होता. त्याबाबत जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी जयसिंगपूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीना तात्काळ अटक करणेबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील एकुण 3 पथके सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहिती घेण्यासाठी नेमण्यात आली. तसेच सदर तपासकामी जयसिंगपूर पोलीस स्टेशनकडील 2 पोलीस पथके अशी एकुण 5 पथके नेमण्यात आली होती.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखा व जयसिंगपूर पोलीस ठाणेकडील तपास पथकास चौकशी दरम्यान मयताचा भाऊ जिनगोंडा ओमगोंडा पाटील याचेवर संशय आला. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अनुषंगाने सखोल चौकशी केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने तोंड उघडलं.
सख्खा भाऊ अविनाश उर्फ दिपक ओमगोंडा पाटील हा दररोज दारु पिऊन घरी भांडण करायचा आणि भावाच्या मुलांना, पत्नीला मारहाण करत होता. त्याच्या या कृत्याला कंटाळून त्याने आपला मित्र मोहन प्रकाश पाटील यास भाऊ अविनाश हा घरी खूप त्रास देत असलेने त्याचा काटा काढणेचा आहे, असे सांगितले. त्यानंतर मित्र मोहन प्रकाश पाटील याने त्याचे ओळखीचे राकेश उर्फ विनोद वसंत थोरात, रा. धनगर वाडा, कुंभोज रोड, दानोळी यास बोलावुन घेवून अविनाश उर्फ दिपक ओमगोंडा पाटील याला ठार मारणेचे आहे असे सांगीतले.
राकेश उर्फ विनोद वसंत थोरात याने अविनाश उर्फ दिपक पाटील यास मारणेसाठी 6 लाख रुपये देण्यास सांगितले. यावर जिनगोंडा ओमगोंडा पाटील याने भाऊ अविनाश उर्फ दिपक पाटील यास ठार मारायच्या आधी 3 लाख व मारलेनंतर 3 लाख रुपये देण्याचे कबुल केले.
त्यानंतर जिनगोंडा ओमगोंडा पाटील याने ठरल्याप्रमाणे राकेश उर्फ विनोद वसंत थोरात रा. धनगर वाडा, कुंभोज रोड, दानोळी यास मोहन प्रकाश पाटील याचे मध्यस्थीने 3 लाख रुपये रोख रक्कम दिली. त्यानंतर राकेश उर्फ विनोद वसंत थोरात याने अविनाश उर्फ दिपक पाटील यास ठार मारणेकरीता त्यांचे सहकारी मित्र किरण आमान्ना थोरात, सागर भिमराव लोहार, अमर रामदास वडर यांना सोबत घेऊन मयत अविनाश उर्फ दिपक पाटील याचेवर तो घरातून किती वाजता बाहेर पडतो व दिवसभर कोठे कोठे जातो यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली होती.
त्यानंतर वरील सर्व नमुद आरोपींनी संगनमत करून दिनांक 26 मे रोजी अविनाश उर्फ दिपक ओमगोंडा पाटील याचेवर पाळत ठेऊन व योग्य संधी पाहून रात्री तमदलगे गावचे हद्दीत बसवान खिंडीत असले निर्जन डोंगरात नेऊन अविनाश उर्फ दिपक पाटील याचे डोक्यात दगड घालुन निघृण खून केलेची कबुली दिली.
त्यानंतर जयसिंगपूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापुर यांनी समांतर तपास यंत्रणा राबवून वरील नमुद आरोपींना निमशिरगाव, दानोळी व भादोले ता. हातकणंगले येथुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यांच्याकडे खुनाच्या गुन्हा अनुषंगाने तपास केला. वरील आरोपींनी अविनाश उर्फ दिपक पाटील रा. निमशिरगाव ता. शिरोळ यांच्या खुन केल्याची कबुली दिलेने सदर आरोपींना गंभीर गुन्ह्याच्या तपास कामी जयसिंगपुर पोलीस ठाणेस हजर करणेत आले आहे. तरी जयसिंगपुर पोलीस ठाणे तपास पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग कोल्हापुर मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गंभीर असा खुनाचा गुन्हा अत्यंत जलदगतीने कौशल्यपुर्ण तपास करून उघड केला.
अटक करण्यात आलेले आरोपी
गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी नामे १) जिनगोंडा ओमगोंडा पाटील, वय ३७ वर्ष, रा. सांगली बायपास रोड, गौंडाप्पा मळा, निमशिरगाव, ता. शिरोळ, २) मोहन प्रकाश पाटील, वय ३३ वर्ष, रा. सांगली बायपास रोड, नायरा पेट्रोल पंप जवळ, निमशिरगाव, ३) राकेश उर्फ विनोद वसंत थोरात वय २३ वर्ष, रा. धनगर वाडा, कुंभोज रोड, दानोळी, ४) किरण आमान्ना थोरात वय २७ वर्ष, रा. नवीन पाण्याची टाकी, धनगर वाडा, दानोळी, ५) सागर भिमराव लोहार, वय ३० वर्ष, रा. दिलदार चौक, भादोले, ता. हातकणंगले, ६) अमर रामदास वडर, वय ३३ वर्ष, रा. दिलदार चौक, भादोले, ता. हातकणंगले यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन जयसिंगपूर पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री योगेशकुमार गुप्ता साो, मा.अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील साो, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी रोहीणी सोळंखे साो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर स्था.गु.अ. शाखा, कोल्हापूर, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, सहायक पोलीस निरीक्षक दिपक कदम, पोसई प्रवीण माने, पोसई युनुस इनामदार, स्था. गु.शा कोल्हापुर कडील पोसई शेष मोरे, पोसई जालिंदर जाधव, पोसई राजीव शिंदे जयसिंगपुर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार सहा. फौजदार विजय गुरखे, निलेश मांजरे, ताहीर मुल्ला, वैभव सुर्यवंशी, बाळासाहेब गुत्ते कोळी, स्था.गु.अ. शाखा, कोल्हापुर यांचेकडील पोलीस अंमलदार नामदेव यादव, संजय कुंभार, महेश पाटील, नवनाथ कदम, दिपक घोरपडे, समीर कांबळे, गजानन गुरव, अमीत सर्जे, महेश खोत, विशाल चौगुले, सागर माने, प्रदीप पाटील, महेद्र कोरवी, राजेंद्र व्हरंडेकर, महादेव कुन्हाडे व सुशील पाटील यांनी केली आहे.























