एक्स्प्लोर

Kolhapur Crime : शरीरसंबंधास विरोध केल्याने महिलेचा निर्घृण खून; पुरावा नष्ट करण्यासाठी ऊसाचा फड पेटवला

Kolhapur Crime : आरोपी गावात ट्रक्टर चालक आहे. त्याला पत्नी व दोन मुली आहेत. मयत आशाताई आईसह माहेरी भादवणला राहत होत्या. एका गरीब महिलेचा खून झाल्याबद्दल गावात संताप व्यक्त करण्यात आला. 

कोल्हापूर : शरीरसंबंधास विरोध केल्याने नराधमाने गळा दाबून निर्घृण खून केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) आजरा तालुक्यातील भादवणमध्ये घटली. आशाताई मारुती खुळे (वय 43) असे या दुर्दैवी महिलेचं नाव असून पुरावा नष्ट करण्यासाठी ऊसाच्या फडाला आग लावण्यात आली. नराधम आरोपी गावामधील असून योगेश पांडुरंग पाटील (वय 35) याला पोलिसांनी अटक केली आहे. योगेशने ऊसाच्या फडात फरफटत नेत गळा दाबून खून  केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी फडाला आग लावली. 

योगेश हा गावात ट्रक्टर चालक आहे. त्याला पत्नी व दोन मुली आहेत. मयत आशाताई आईसह माहेरी भादवणला राहत होत्या. एका गरीब महिलेचा खून झाल्याबद्दल गावात संताप व्यक्त करण्यात आला. 

ऊसाच्या फडात नेऊन बलात्कार करण्याचा प्रयत्न 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आशाताई गुरुवारी दुपारी घरातील कचरा टाकण्यासाठी भादवण-भादवणवाडी रस्त्यावर असलेल्या ओढ्याकडे गेल्या होत्या. नराधम योगेश पाटील त्यांच्यावर पाळत ठेवून असल्याने त्या येताच योगेशने त्यांना ऊसात फडात ३० फूट अंतरावर फरफटत नेले. ऊसात नेल्यानंतर त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आशाताई यांनी आरडओरडा केला. यावेळी योगेशने त्यांचे तोंड दाबून साडीने गळा आवळून खून केला. 

खून करून पळून गेला 

आशाताईंचा गळा दाबून खून केल्यानंतर त्याने ऊसाच्या फडातून पळ काढून घरात निघून गेला. त्यानंतर पुन्हा तो त्या परिसरात ये जा  करत होता. यानंतर त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने सायंकाळी उसाच्या फडाला आग लावून दिली आणि पुन्हा घरात येऊन थांबला. ऊसाची आग गावकऱ्यांनी आटोक्यात आणल्यानंतर अर्धवट अवस्थेत जळालेला आशाताई यांचा मृतदेह दिसला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. 

सीसीटीव्हीमुळे नराधम सापडला 

आगीचा शोध घेण्यासाठी रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात आली. यावेळी योगेश तेथून चार-पाच वेळा फेऱ्या मारताना कैद झाला होता. पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतल्यानंतर खून केल्याची कबुली दिली. 

महिलेचा दोन वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आयुष्याचा शेवट

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी माहेरकडून दोन लाख रुपये आणण्यासाठी सासरमधील छळाला कंटाळून महिलेने दोन वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भुदरगड तालुक्यातील भेंडवडे गावात घडली होती. काजल सलते आणि प्रियांशू सलते अशी मृतांची नाव आहेत. भुदरगड पोलिसांत पती, सासू, सासरा आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.  माहेरकडून दोन लाख रुपये घेऊन ये असा तगावा काजल यांच्याकडे लावला होता. मात्र सासरच्या लोकांची ही मागणी पूर्ण होत नसल्याने काजल यांचा छळ केला जात होता. या त्रासाला कंटाळूनच काजल यांनी घरापासून जवळच असलेल्या विहिरीत दोन वर्षाच्या प्रियांशुला घेऊन उडी टाकली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Portfolio : शिवेंद्रराजे अन् जयकुमार गोरेंचा पहिल्याच चेंडूवर थेट षटकार; दादा आणि भाईंच्या खात्यातही राज्यमंत्रीपदी फडणवीसांचे विश्वासू शिलेदार!
शिवेंद्रराजे अन् जयकुमार गोरेंचा पहिल्याच चेंडूवर थेट षटकार; दादा आणि भाईंच्या खात्यातही राज्यमंत्रीपदी फडणवीसांचे विश्वासू शिलेदार!
खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच, भरत गोगावलेंचा मोठा दावा, अजितदादांनाही टोला
खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच, भरत गोगावलेंचा मोठा दावा, अजितदादांनाही टोला
मोठी बातमी! माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह MIM च्या 30 आंदोलकांवर गुन्हे दाखल, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आक्षेप
मोठी बातमी! माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह MIM च्या 30 आंदोलकांवर गुन्हे दाखल, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आक्षेप
Maharashtra Cabinet Portfolio : अखेर खातेवाटप जाहीर, उत्तर महाराष्ट्रातील आठ मंत्र्यांना कुठली खाती? वाचा एका क्लिकवर
अखेर खातेवाटप जाहीर, उत्तर महाराष्ट्रातील आठ मंत्र्यांना कुठली खाती? वाचा एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Meet Santosh Deshmukh Family | ओमराजेंनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेटAjit Pawar Angry : खातेवाटपाचा प्रश्न, अजित पवार चिडले! म्हणाले, Pratap Sarnaik : सरनाईकांना नातवामुळे मंत्रिपद मिळालं? स्वतः सांगितला लाल दिव्याचा किस्साTop 80 at 8AM Superfast 22 December 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Portfolio : शिवेंद्रराजे अन् जयकुमार गोरेंचा पहिल्याच चेंडूवर थेट षटकार; दादा आणि भाईंच्या खात्यातही राज्यमंत्रीपदी फडणवीसांचे विश्वासू शिलेदार!
शिवेंद्रराजे अन् जयकुमार गोरेंचा पहिल्याच चेंडूवर थेट षटकार; दादा आणि भाईंच्या खात्यातही राज्यमंत्रीपदी फडणवीसांचे विश्वासू शिलेदार!
खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच, भरत गोगावलेंचा मोठा दावा, अजितदादांनाही टोला
खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच, भरत गोगावलेंचा मोठा दावा, अजितदादांनाही टोला
मोठी बातमी! माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह MIM च्या 30 आंदोलकांवर गुन्हे दाखल, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आक्षेप
मोठी बातमी! माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह MIM च्या 30 आंदोलकांवर गुन्हे दाखल, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आक्षेप
Maharashtra Cabinet Portfolio : अखेर खातेवाटप जाहीर, उत्तर महाराष्ट्रातील आठ मंत्र्यांना कुठली खाती? वाचा एका क्लिकवर
अखेर खातेवाटप जाहीर, उत्तर महाराष्ट्रातील आठ मंत्र्यांना कुठली खाती? वाचा एका क्लिकवर
Weather Update: पुण्यासह राज्याच्या 'या' भागात हवापालट, थंडीचा जोर ओसरला, कसं राहणार तापमान, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पुण्यासह राज्याच्या 'या' भागात हवापालट, थंडीचा जोर ओसरला, कसं राहणार तापमान, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Nashik Fog : नाशिक शहरावर पसरली धुक्याची दाट दुलई, वाहन चालकांची कसरत, पाहा PHOTOS
नाशिक शहरावर पसरली धुक्याची दाट दुलई, वाहन चालकांची कसरत, पाहा PHOTOS
Sharad Pawar Convoy Accident : 3 ते 4 गाड्या एकमेकांना आदळ्या, शरद पवारांच्या ताफ्याचा अपघात
Sharad Pawar Convoy Accident : 3 ते 4 गाड्या एकमेकांना आदळ्या, शरद पवारांच्या ताफ्याचा अपघात
Mumbai: उपद्रवी तळीरामांवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 54 चारचाक्या जप्त, 62 हजारांचा दंड
उपद्रवी तळीरामांवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 54 चारचाक्या जप्त, 62 हजारांचा दंड
Embed widget