एक्स्प्लोर

Kolhapur Covid-19 Update : कोल्हापूर जिल्ह्यात तिघांना कोरोनाची लागण; खासगी रुग्णालयात उपचार सुरू

Kolhapur Covid-19 Update : कोल्हापूर जिल्ह्यात तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या या सर्वांची प्रकृती सुधारत असून ते  लवकरच बरे होतील असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला.

Kolhapur Covid-19 Update : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur Covid-19 Update) तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून, दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोल्हापूर महापालिका हद्दीतील 83 वर्षांच्या वृद्धाला कोरोनाची लागण झाली होती. 12 मे रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले आहेत. त्यातून ते बरेही झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील एका 40 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली असून, त्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाहूवाडी तालुक्यातील एका 40 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. 20 मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या या सर्वांची प्रकृती सुधारत असून ते  लवकरच बरे होतील असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला.

देशात एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 257 वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक 95 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तामिळनाडूमध्ये 66, महाराष्ट्रात 56 आणि कर्नाटकात 13 सक्रिय रुग्ण आहेत. सोमवारी मुंबईतील केईएम रुग्णालयात 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. तथापि, डॉक्टरांचे म्हणणे आहे की त्यांचा मृत्यू कोविडमुळे नाही तर दीर्घकालीन आजारांमुळे झाला. एका रुग्णाला तोंडाचा कर्करोग होता आणि दुसऱ्याला नेफ्रोटिक सिंड्रोम, मूत्रपिंडाचा आजार होता.

आशियात वेगाने पसरणारा कोरोनाचा नवीन प्रकार 

दरम्यान, आशियातील सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि थायलंडमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. या देशांमध्ये नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. सिंगापूरमध्ये 1 मे ते 19 मे दरम्यान 3 हजार रुग्णांची नोंद झाली. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही संख्या 11 हजार 100 होती. येथे रुग्णांमध्ये 28 टक्के वाढ झाली. जानेवारीपासून हाँगकाँगमध्ये 81 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 30 जणांचा मृत्यू झाला आहे. चीन आणि थायलंडमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. तथापि, येथील रुग्णांच्या संख्येबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 1 जानेवारी ते 19 मे या कालावधीत भारतात 257रुग्ण आढळले आहेत. 

भारतातील परिस्थिती नियंत्रणात 

भारतात सध्या कोरोनाची कोणतीही मोठी लाट नाही. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते, 1 जानेवारी ते 19 मे या कालावधीत देशात फक्त 157 रुग्ण आढळले आहेत. तथापि, सरकारच्या मते, भारतात कोविड-19 ची परिस्थिती अजूनही नियंत्रणात आहे. मुंबईतील डॉक्टरांना सौम्य लक्षणे असलेले अधिक रुग्ण आढळले आहेत, विशेषतः तरुणांमध्ये, परंतु नवीन लाटेबद्दल कोणतीही माहिती नाही. शेजारील देशांमध्ये वाढती प्रकरणे पाहता भारतीय आरोग्य तज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा आणि लस घेण्याचा सल्ला दिला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget