Ambabai Mandir Paid E-Pass : अंबाबाई मंदिरातील पेड ई पासला कोल्हापूर दिवाणी न्यायालयाची तात्पुरती स्थगिती
Ambabai Mandir Paid E-Pass : अंबाबाई मंदिरातील पेड ई पासला कोल्हापूर दिवाणी न्यायालयाची तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. ई पास संदर्भात जिल्हा प्रशासनाने भूमिका स्पष्ट करण्यास वेळ मागितली आहे.
Ambabai Mandir Paid E-Pass : अंबाबाई मंदिरातील पेड ई पासला कोल्हापूर दिवाणी न्यायालयाची तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. ई पास संदर्भात जिल्हा प्रशासनाने भूमिका स्पष्ट करण्यास वेळ मागितल्याने ई पेड पासला तात्पूरती स्थगिती देण्यात आली आहे. पेड ई पासबाबत पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.
दिवाणी न्यायालयाने दाखल केलेल्या याचिकेवर निकाल येईपर्यंत पेड ई पास देण्यास मनाई केली आहे. श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी ई पास निर्णयाला विरोध करत याचिका दाखल केली आहे. मुनीश्वर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.
नवरात्रोत्सवामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दोनशे रूपये आकारून दिवसाला 1 हजार ई पास देण्याचा निर्णय घेतला आहे, या निर्णयाला श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात आव्हान दिले आहे.
अंबाबाई मंदिरामध्ये महाराष्ट्र सरकारने देवीच्या दर्शनासाठी कोणत्याही देवस्थानने भाविकांसाठी नियमित रांगेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने दर्शन घेण्यास परवानगी घेण्यात येऊ नये व तशी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊ नये. कोणत्याही मार्गाने रक्कम आकारून दर्शनासाठी प्रवेश देऊ नये. दर्शनासाठी पासेस किंवा प्रवेशपत्रिका वितरित करू नये, अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना सात सप्टेंबर 2010 ला जाहीर केल्या होत्या. 15 ऑक्टोबर 2010 मध्ये मंजूर करून शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने कोणालाही दर्शन देऊ नये म्हणून मनाई केली आहे. याबाबतचे पत्र देऊनही त्याचा विचार झाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दिवसाला फक्त 1 हजार भाविकांना पेड ई पासद्वारे दर्शन
नवरात्रोत्सव काळात अंबाबाई मंदिरात पेड ई पास सुविधा दिली जाणार आहे. या उपक्रमाला हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा विरोध केला होता. तथापि, जिल्हाधिकारी राहुल रेखावार पेड ई पास उपक्रमावर ठाम आहेत. उत्सव काळामध्ये ऑफलाईन पद्धतीने हे ई पास दिले जाणार आहेत. दिवसाला फक्त 1 हजार भाविकांना या पेड ई पासद्वारे दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे इतर भाविकांची कोणतीही गैरसोय नसल्याचा दावा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या