एक्स्प्लोर

Kolhapur News: कोल्हापुरात अडीच महिन्यांपासून आयुक्तांचा पत्ता नाही आणि आता थेट जिल्हाधिकाऱ्यांना हटवण्याची मागणी!

Kolhapur News : कोल्हापूर भाजपकडून जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजप नेते अजित ठाणेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हटवा, अशी मागणी केली आहे.

Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिकेला गेल्या अडीच महिन्यांपासून आयुक्तांचा पत्ता नसतानाच आता कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तसेच काळजीवाहू आयुक्त राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांनाच हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. कोल्हापूर भाजपकडून जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजप नेते अजित ठाणेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हटवा, अशी मागणी केली आहे. कोल्हापूर मनपा प्रशासकांची 2 जून रोजी बदली झाल्यापासून महापालिकेचे काळजीवाहू आयुक्त म्हणून जबाबदारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा कार्यभार आहे. 

अजित ठाणेकर म्हणाले की,  जिल्हाधिकारी रेखावर यांच्या कार्यावर आमचा आक्षेप आहे. शिवाय यावर्षी पुन्हा एकदा महापूर येऊन नागरिकांना आपत्तीला तोंड द्यावा लागेल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. त्यानंतर अनेकांचे स्थलांतर केले. त्यामुळे भीतीचं वातावरणही निर्माण झाले होते. यामागे नेमकं काय कारण आहे? असा सवाल सुद्धा भाजप नेते अजित ठाणेकर यांनी केला आहे. अंबाबाई मंदिरात सुद्धा गरुड मंडपात विधी बंद आहेत. मंडप दुरुस्तीबाबत उद्याप काहीही पावले उचलली नाहीत,  मंडप तत्काळ सुरू करावा. कारण आता नवरात्रोत्सव सुद्धा जवळ येत आहे, असेही ठाणेकर यांनी म्हटलं आहे. 

परवानाधारकांवर दंडेलशाही केली जातेय 

पत्रकात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी रेखावार यांनी जुलै महिन्यात हवामान खात्याच्या अंदाजाचा आधार घेऊन कोल्हापुरात महापूर येणार, अशी आवई उठवली आणि जिल्ह्यात दहशत निर्माण केली. महाद्वार रोडवरील अनेक दुकाने आणि व्यवसाय धोकादायक इमारतीच्या नावाखाली बंद पाडले. याच रस्त्यावर अवैध बांधकामे व बेकायदेशीर लॉजिंग, यात्री निवास सुरू आहेत. मात्र, परवानाधारकांवर दंडेलशाही केली जात आहे. शहरातील सुमारे 60 व्यवसाय 10 दिवस बंद ठेवले. 

त्यांचा अट्टाहास हा मंदिरातील वातावरण क्लुषित करतोय 

देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनामध्ये सुरू झालेली भक्तांची दर्शनाची संग, अनेक भक्तांनी तक्रार करूनही अजून घंटा चौकातून पुढे जात आहे आणि देवस्थान समितीच्या काही खास पाहुण्यांना मात्र गाभाऱ्यात नेऊन दर्शनाची व्यवस्था केली जात आहे. देवस्थानामधील धार्मिक विधी कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडतील याची काळजी घेणे अपेक्षित असताना नवनवीन परंपरा सुरू करण्याचा त्यांचा अट्टाहास हा मंदिरातील वातावरण क्लुषित करीत आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिव पदावरून शिवराज नाईकवाडे यांना तडकाफडकी बाजूला केल्यानंतर राहुल रेखावार वादाच्या केंद्रस्थानी आले होते.   

इतर महत्वाच्या बातम्या : 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
Embed widget