एक्स्प्लोर

बाईकवरुन जाताना गळ्यावर धारदार मांजा फिरला, मांसाचा लगदा बाहेर आला, छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापाऱ्याचा गळा कापला

काही दिवसांपूर्वीचं छत्रपती संभाजीनगरच्या जिन्सी भागात पायी जाणाऱ्या तरुणाचा गळा चिरल्याचा प्रकार समोर  आला होता.

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरात दुचाकीवरून जात असताना तरुण व्यापाऱ्याच्या गळ्यावर नायलॉन मांजा फिरल्याची गंभीर घटना घडली आहे. शहरातील वैजीनाथ महादेव मंदिराजवळ हा प्रकार घडला. यात नवजीवन कॉलनीतील रहिवासी असलेल्या विशाल बोथरा या तरुण व्यापाऱ्याच्या गळ्यावर धारदार मांजा फिरल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे तो रस्त्यावरच कोसळला आणि काही क्षणांतच गंभीर जखमी झाला. या घटनेने वैजापुरात पुन्हा एकदा नायलॉन मांजाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. (Naylon Manja Accident)

Naylon Manja Accident: नेमकं घडलं काय?

धारदार मांजामुळे गळ्याला मोठी जखम झाल्याने उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. परिसरातील लोकांना आवाज ऐकू येताच त्यांनी जखमीला उचलून तात्काळ जवळच असणाऱ्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत असल्याने डॉक्टरांनी त्वरेने प्राथमिक उपचार केले. गळ्यावर झालेल्या जखमेची तीव्रता पाहता तज्ञांची अधिक मदत आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे प्राथमिक उपचारानंतर विशाल बोथराला तातडीने नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या घटनेमुळे वैजापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. नायलॉन मांजामुळे होणारे अपघात पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजावरून दरवर्षी असे प्रकार चर्चेत येतात . गेल्यावर्षी याच काळात नॉयलॉन मांजाने घडलेल्या घटनांनंतर औरंगाबाद खंडपीठाने कारवाईचे आदेश दिले होते . 

मांजाने गळा कापला

घटना अचानक घडल्याने मांजा नेमका कसा आणि कुठून आला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. मात्र या अपघातामुळे वाहतूक मार्गांवर अधिक सतर्कतेची गरज अधोरेखित झाली आहे. वैजापूर शहरात पतंगबाजीच्या काळात अशा मांजाचा धोका वाढतो, आणि त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होतोय. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काळात अशा घटनांना आळा बसावा यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.  काही दिवसांपूर्वीचं छत्रपती संभाजीनगरच्या जिन्सी भागात पायी जाणाऱ्या तरुणाचा गळा चिरल्याचा प्रकार समोर  आला होता. पुन्हा एकदा घडलेल्या या अपघातामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, विशाल बोथरा यांना नाशिकमध्ये अधिक उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती तपासणीखाली आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळाली असली तरी जखमेची तीव्रता पाहता त्यांना पुढील काही दिवस उपचार घ्यावे लागण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.  

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Embed widget